आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतीत अपयश येत असेल तेव्हा उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरीच्या मुलाखतीसाठी वारंवार जात आहात. पहिल्या-दुसऱ्या फेरीत उत्तीर्णही होत आहात, पण अंतिम फेरीत कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर केले जात आहे. असे होत असेल तेव्हा आपण या नोकरीसाठी पात्र होतो की नाही की चुकीची जागा, चुकीच्या नोकरीसाठी अर्ज केला की काय, असा संशय स्वत:बद्दल निर्माण होतो. असे असेल तर काही उपाय उपयुक्त ठरतात.
 
सर्वात आधी एक वही घ्या आणि मुलाखतीचा संपूर्ण अनुभव तीत लिहा. आठवणीतील प्रत्येक गोष्ट आणि अनुभव लिहा. मुलाखतीच्या प्रक्रियेपासून ते ज्या लोकांना तुम्ही भेटलात त्या सर्वांबद्दल लिहू शकता. प्रत्येक मुलाखतीत काहीतरी धडा मिळतोच. लिहिण्याने तो समोर येऊ शकतो. 
 
ज्या नोकरीसाठी गेलो होतो त्यासाठी आपण आदर्श व्यक्ती नव्हतो असेही तुम्हाला कळू शकते. मुलाखतीच्या वेळी वातावरण थोडे वेगळे होते, असे लिहिताना तुम्हाला समजू शकते. या सर्वांचे आकलन केल्यानंतर, पुढच्या वेळी मुलाखतीला जाण्यासाठी काय तयारी करावी लागेल याचा धडा मिळेल. 
 
नोकरी मिळणे, न मिळणे वेगळी गोष्ट आहे, पण संबंध वेगळी बाब आहे. काही गोष्टी वेगाने बदलतात, पण संबंध दीर्घ काळ राहू शकतात. त्यामुळे भलेही नोकरी मिळाली नाही तरी तुम्ही हायरिंग मॅनेजरला एक आभारपत्र पाठवू शकता. त्यात संपूर्ण अनुभवासाठी त्यांचे आभार मानू शकता. ज्या व्यक्तीला त्यांनी घेतले आहे ती काही कारणांमुळे त्यांना पात्र वाटत नाही, असेही होऊ शकते किंवा मग पुढील आठवड्यात पुन्हा नवी नोकरीही निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत हे संबंध नंतर उपयुक्त ठरू शकतात.  
 
प्रत्येक मुलाखत आणि लोकांशी गाठभेट तुम्हाला मजबूत बनवते हे लक्षात ठेवावे. योग्य संधीसाठी तयार राहण्याची ही प्रक्रिया आहे. नोकरी शोधण्याचे काम वाढवणे. तुमच्यासाठी कुठे संधी आहे हे तेथे गेल्यानंतर कळेल; पण त्यापेक्षाही तुम्ही पात्र आहात आणि जो तुम्हाला नियुक्त करेल तो नशीबवान असेल हे लक्षात ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे.  
बातम्या आणखी आहेत...