आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Didn't Beat Mouse, Tunisia Attack Acussed Confession

त्याने कधी उंदीरही मारला नव्हता! ३८ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईचे बोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ट्युनेशियाच्या रिसॉर्टवर ३८ लोकांची हत्या करणा-या हल्लेखोराने पूर्वी कधी साधा उंदीरही मारला नव्हता, असा दावा त्याच्या आईने केला आहे. आपला मुलगा इतरांप्रमाणे ब्रेनवॉशिंगचा बळी ठरला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

सैफुद्दीन रेजगुई या २३ वर्षीय तरूणाने पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर रायफलने अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या घटनेनंतर त्याची आई राधिया मनाय (४९) यांनी संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, माझ्या मुलाने लोकांना ठार केले, असे सांगितले. ही गोष्ट अशक्य असल्याची माझी पहिली प्रतिक्रिया होती. राधिया म्हणतात, एकदा घरात उंदील घुसला होता. सैफुद्दीनला त्याला मारण्यास सांगितले. परंतु मी कोणालाही मारू शकत नाही, असे तो म्हणाला होता, अशी आठवण राधिया यांनी सांगितली.

ब्रेकडान्सिंग आणि फुटबॉलचा वेडा
सैफुद्दीनचे वडील हकीम रेजगुई म्हणाले, माझ्या मुलाला ब्रेकडांन्सिग आणि फुटबॉलचे वेड होते. तो रिअर माद्रिद, लिव्हरपूल, मॅन युनायटेड त्याला आवडत होते. ट्युनेशियाचे पंतप्रधान हबीब असिद यांनी देखील फ्रेंच वृत्तपत्र ला प्रॅससमोर देखील या दाव्यांची पुष्टी केली आहे.

मला पीडितांबद्दल सहानुभूती
मृत व्यक्तींबद्दल मला दु:ख वाटते. परंतु हत्या करणारा दुसराच कोणीतरी सैफुद्दीन आहे. माझा मुलगा दहशतवाद्यांकडून झालेल्या ब्रेनवॉशिंगचा शिकार झाला आहे. त्यामागे कोण आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याला तुरूंगात टाकावे किंवा ठार करायला हवे.

सर्वाधिक ब्रिटनचे नागरिक
सैफुद्दीनने सर्वाधिक ब्रिटनच्या नागरिकांना आपले लक्ष्य केले. त्याच्या हल्ल्यात ब्रिटनचे ३० नागरिक ठार झाले. त्या घटनेतील मृतांमध्ये आयर्लंडचे तीन, जर्मनीचे दोन, बेल्जियम आणि पोर्तुगालचे प्रत्येकी एक आणि रशियाच्या एका नागरिचा मृत्यू झाला होता.