आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये इतका भयाण महापूर की मृत मुलांना अंत्यसंस्कार करायलाही नाही जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमधील कोशी नदीत मुलावर अंत्यसंस्कार करताना एक पिता... - Divya Marathi
नेपाळमधील कोशी नदीत मुलावर अंत्यसंस्कार करताना एक पिता...
इंटरनॅशनल डेस्क- आपला शेजारी देश नेपाळमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे महापूराने कहरच केला आहे. भीषण महापूर आल्याने तेथे रविवारी 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यासोबतच नेपाळमध्ये या महापूरात मृतांचा आकडा 300 पार झाला. नेपाळमध्ये महापूराच्या स्थितीने स्थिती इतकी बिघडली आहे की, मृत मुलांना अंत्यसंस्कार करायलाही जागा मिळाली नाही. कारण जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. कोशी नदीजवळील एका गावातील एका कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला पण जागाच नसल्याने त्यांनी कोशी नदीत सोडत अंत्यसंस्कार केले. 500 हून अधिक शाळा इमारती पडल्या....
 
- मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूर आणि भूस्खलनामुळे कमीत कमी 500 शालेय इमारती पडल्या आहेत.  
- खरं तर, गरीब असलेल्या नेपाळ देशात महापूराच्या काळात कच्च्या घरात राहणारे अनेक लोक या शाळेच्या इमारतीत आसरा घेतात. मात्र, त्या शाळाच पडल्याने लोकांचे हाल होत आहेत. 
- उत्तर भारत, दक्षिण नेपाळ आणि उत्तरी बांग्लादेशाच्या भागात लाखों लोकांचे हाल या महापूरामुळे होत आहे. आतापर्यंत हजारहून अधिक लोकांचे या महापूरामुळे प्राण गेले आहेत. 
- संयुक्त राष्ट्राच्या एक संस्थेने म्हटले की, भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये अंदाजे एक कोटी 60 लाख मुलांना तेथे आलेल्या ‘‘विनाशकारी’’महापूरामुळे जीवन-रक्षक मदतीची तत्काळ गरज आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नेपाळमध्ये आलेल्या महापूराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...