जपानच्या पूर्व आणि ईशान्य भागातील बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. रस्ते अपघात आणि बर्फवृष्टीमुळे जपान एक्स्प्रेस वेचा काही भाग बंद करण्यात आला. सोमवारी शिंकनसेन बुलेट ट्रेन रद्द करण्यात आली. राजधानी टोकियोसह अनेक ठिकाणचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. जपानच्या हवामान विभागानुसार चिचीबू शहरात ३२ सेंमी आणि मात्सुमोतो शहरात ३१ सेंमी बर्फवृष्टी नोंदवण्यात आली. मंगळवारी तोहोकूमध्ये ८० सेंमी आणि होक्काइदो, होकुरिकू तसेच तोकाई भागात ६० सेंमीपर्यंत बर्फवृष्टी नोंदली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, असे झाले जनजीवन विस्कळीत....