आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Snowfall In Newyork Washington 19 Died In Reported

US मध्ये शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळ, आतापर्यंत 19 दगावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्फवृष्टीने रस्ते अदृष्य झाले आहेत, तर रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने बर्फाने झाकली गेली आहेत. - Divya Marathi
बर्फवृष्टीने रस्ते अदृष्य झाले आहेत, तर रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने बर्फाने झाकली गेली आहेत.
न्यूयॉर्क - अमेरिकेची अनेक शहरे हिमवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनच्या अनेक शहरांमध्ये रस्त्यावर बर्फाचे मोठे थर जमा झाले आहेत. वाहतुकीसह वीज आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. हिमवादळात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

बर्फवृष्टीने परिस्थिती बिघडली
- न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बर्फवृष्टी 25.1 इंच (63.7 सेमी) झाली.
- वॉशिंग्टनमध्ये 2 फूटापर्यंत बर्फ जमा झाला आहे. याआधी येथे 1922 मध्ये 28 इंच बर्फवृष्टी झाली होती. 2010 मध्ये 17.8 इंच बर्फवृष्टी झाल्याचे नोंदवले गेले होते.
- नॅशनल वेदर सर्व्हिसच्या माहितीनुसार आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
- न्यूयॉर्कमध्ये 3, मेरीलँडमध्ये अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. व्हर्जिनियामध्ये दोन लोक थंडीचे शिकार झाले.
- नॉर्दन न्यूजर्सी आणि वेस्टर्न लॉन्ग आयलँड येथे ताशी 72 किमी वेगाने वारे वाहात आहे.
- शीत लहरीमुळे व्हिजिबिलिटी 400 मीटर पेक्षा कमी झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्