आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: घरासमोरच्या रस्त्यावर खेळत होता चिमुकला, अंगावरुन गेला अवजड ट्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर अंगावर काटाच उभा राहतो. यात एक अवजड ट्रक रस्त्यावर खेळत असलेल्या चिमुकल्याच्या अंगावरुन जातो. पण सुदैवाने चिमुकला वाचला.
चीनमधील एक चिमुकला रस्त्यावर खेळत होता. तेव्हा एक अवजड ट्रक मागे येत या चिमुकल्यावरुन निघून गेला. आता काय झाले असेल असा प्रश्न हा व्हिडिओ बघताना आपल्याला पडतो. ट्रक येत असल्याचे बघून बालबुद्धीत आल्याप्रमाणे हा चिमुकला रस्त्यावर लेटला. त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ट्रक निघून गेल्यावर चिमुकल्याने घराच्या दिशेने पळ काढला. ही घटना 8 जूनला घडली.
अशा अनेक घटना आपल्याही आवारात घडत असतात. त्यामुळे गाडी रिव्हर्स घेताना एखाद्या व्यक्तीला गाडीच्या मागे मार्ग दाखविण्यासाठी उभे राहायला सांगा. जर असे शक्य नसेल तर गाडीच्या मागे कुणी आहे का, याची आधी शहानिशा करुनच गाडी मागे घ्या. तुमची ही कृती एक जीव वाचवू शकते.