आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमधील हेलिकॉप्टर अपघातात नऊ जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
टोकियो  - जपानमध्ये या आठवडाअखेर ९ प्रवासी असलेले एक हेलिकॉप्टर पर्वतामध्ये बचाव कार्याची रंगीत तालीम करताना कोसळले. त्यातील सर्वांचाच या अपघातात मृत्यू झाला आहे. वाईट हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले, अशी माहिती पोलिसांनी आज सोमवारी दिली.  या अपघातातील ९ मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह सकाळपर्यंत अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या मलब्यात मिळाले आहेत. इतर तीन जण ज्यात पायलटचाही समावेश आहे. त्यांचीही मृत पावल्याची खात्री काल रविवारीच पटली होती. हे हेलिकॉप्टर मध्य प्रांतातील पर्वतीय क्षेत्रात नगानो येथे अपघातग्रस्त झाले, अशी माहिती नगानो पोलिसांनी दिली.  अपघाताचे स्थळ बर्फाळ पर्वतातील दुर्गम भागात आहे. स्थानिक सरकारला व अधिकाऱ्यांच्या या बचाव कार्यात खराब हवामानामुळे सोमवारीही अडथळे येत होते. सरकार या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक चौकशी सदस्यांची टीम पाठविणार आहे. हवेतून घेतलेल्या छायाचित्रात हेलिकॉप्टर खूपच वाईट पद्धतीने अपघातग्रस्त झाल्याचे दिसत आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...