आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; १२ जवान ठार, तांत्रिक बिघाडातून घडलेली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदहार- अफगाणिस्तान लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान १७ जण ठार झाले. त्यात १२ जवानांचा समावेश आहे. ही घटना झाबूल प्रांतात गुरुवारी घडली.

झाबूल प्रांतातील शिंके जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. घटनेत हेलिकॉप्टरचे पाच कर्मचारी आणि १२ जवानांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडातून ही दुर्घटना घडली. सरकारकडून मृतांच्या आकड्याला दुजोरा देण्यात आला आहे. देशात बंडखोरांच्या कारवायादेखील सुरूच असतात. त्यातून लष्कराला लक्ष्य केल्याचे २०११ मध्ये दिसून आले होते. नाटोच्या हेलिकॉप्टरवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० अमेरिकी ठार झाल्याची घटना त्या वेळी घडली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंदहार प्रांतात ब्रिटिश लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून ५ जवान ठार झाले होते. अद्यापही नाटोच्या नेतृत्वाखालील फौजा अफगाणिस्तानात तैनात आहेत. सुमारे १३ हजार जवान दहशतवादी संघटनांचा मुकाबला करत असून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली दहशतवादाच्या विरोधातील लढाई अद्यापही संपलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...