आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चर्चमध्ये दारु पितात बिशप, बाटल्या हातात घेऊन करतात प्रार्थना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातात बॉटल घेतलेले बिशप Tsietsi Makiti. - Divya Marathi
हातात बॉटल घेतलेले बिशप Tsietsi Makiti.
जोहान्सबर्ग- चर्चमध्ये नशेत प्रार्थना करणे तु्म्हाला आश्चर्यकारक वाटत असेल पण हे सत्य आहे. जोहान्सबर्गच्या गोबोला चर्चच्या एका खोलीत असेच दृश्य नजरेस पडते. येथील फादरच्या हातात चक्क दारुही बाटली असते. थंड बिअरपासून रेड वाईन पर्यंत सगळ्यांची आवडती दारु येथे उपलब्ध असते. या चर्चची उभारणी 52 वर्षीय Bishop Tsietsi Makiti  यांनी केली आहे. 
 
काय आहे या चर्चचे वेगळेपण?
- या चर्चला Tsietsi Makiti यांनी बनवले आहे. ज्यांना कोणत्याही चर्चमध्ये परवानगी नसते त्यांना येथे परवानगी देण्यात येते. त्यांना दारु पिण्याविषयी विचारल्यावर त्यांनी हा आनंदाचा मार्ग असल्याचे सांगितले.
- ते पुढे म्हणाले, जोपर्यत जीजस या धरतीवर आले नव्हते तोपर्यत लोकांकडे आनंदाचा मार्ग नव्हता. त्यांनी पाण्याला वाईनमध्ये बदलले त्यामुळे शरिराला उर्जा मिळू शकते. त्यामुळे येथे सगळे प्रार्थनेनंतर आणि पुर्वी दारु पितात. त्यामुळे शांततेचा आनंद मिळतो.
 
ईश्वर आहे सगळीकडे
- Michael Motsepe नावाच्या व्यक्तीने सांगितले की येथे आल्यावर त्यांना घरी आल्यासारखे वाटते. तुम्ही येथे दारु का पिता असे विचारल्यावर ते म्हणाले की ईश्वर जागेबाबतही कोणताही भेदभाव करत नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...