आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाब परिधान करणाऱ्या महिलेने व्हाइट हाऊसची नोकरी सोडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी केल्याचे जाहीर करताच हिजाब परिधान करणाऱ्या महिलेने घाबरून व्हाइट हाऊसमधील नोकरीचा राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या निर्णयाच्या आठ दिवसांतच तिने हे पाऊल उचलले.  
 
२०११ पासून रुमाना अहमद नावाची महिला व्हाइट हाऊसमध्ये नोकरीला होती. रुमाना मूळच्या बांगलादेशातील आहेत. माझ्या देशाच्या संस्कृतीचा प्रचार करणे, त्याच्या बाजूने उभे राहणे हेच माझे महत्त्वाचे काम आहे. मी एक हिजाब परिधान करणारी मुस्लिम महिला आहे. वेस्ट विंगमध्ये मी एकटीच हिजाबधारी होते. आेबामा प्रशासनाने माझे नेहमीच स्वागत केले. त्यांच्या कार्यकाळातील वागणूक चांगली होती, असे रुमाना यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसमधील नोकरी सोडण्यामागील भूमिका रुमाना यांनी एका वृत्तपत्रातून लेखाद्वारे मांडली आहे.  मला राष्ट्रीय सुरक्षा मंडळात काम करण्याची इच्छा होती. परंतु इस्लामबद्दल ट्रम्प व त्यांच्या प्रशासनाचे विचार अत्यंत वाईट आहेत. 
 
ट्रम्प यांनी मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांना देशात प्रवेशबंदी करण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर नोकरी सोडून द्यायची असा निर्धार केला.  वरिष्ठांना राजीनाम्याबद्दल सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया चकित करणारी होती. तुम्ही सरकारशी असलेले सगळे संबंध तोडून टाकणार का ? की शांत राहणार ? अशी विचारणा झाली होती. हे अपमानास्पद आहे. 
बातम्या आणखी आहेत...