आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध इस्लामी स्टेटविरुद्ध, मुस्लिमांविरुद्ध नव्हे ! हिलरी क्लिंटन यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेस मोइनेस - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतील तीन प्रमुख उमेदवारांनी पॅरिस हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी इस्लामी स्टेटविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन केले. मात्र, त्याचबरोबर युद्धात सामान्य मुस्लिमांचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. या तीन उमेदवारांमध्ये माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री हिलरी क्लिंटन, सिनेटर बर्नी सँडर्स आणि मेरीलँडचे माजी गव्हर्नर मार्टिन ओमॅली यांचा समावेश आहे.
तिघांनी चर्चेदरम्यान एक मिनिट मौन पाळून पॅरिसमधील मृतांना श्रद्धांजली वाहिली. हिलरी म्हणाल्या, जिहादींना नष्ट केले पाहिजे. मात्र, युद्ध इस्लामविरुद्ध नव्हे, अतिरेक्यांविरुद्ध असावे हे ध्यानात घ्यावे. इस्लामी स्टेट एवढे धोकादायक आहे की, त्यांचा अटकाव केला जाऊ शकत नाही. त्यांचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. तिन्ही नेत्यांनी जिहादींना नष्ट करण्याचे मत मांडले. मात्र, या युद्धाचे नेतृत्व अमेरिकेने करावे यावर त्यांच्यात मतभिन्नता होती.

हिलरी म्हणाल्या, लष्करी शक्तीसह सर्व रासायनिक शस्त्रेही अमेरिकेकडे आहेत. मात्र, हे केवळ अमेरिकेचे युद्ध नाही. ओमॅली यांनी त्यास विरोध दर्शवत म्हटले की, हे युद्ध अमेरिकेचेच आहे. सँडर्स यांनी हिलरी यांच्यावर आरोप करत म्हटले की, त्यांनी इराक युद्धाचे समर्थन केले होते. याच कारणामुळे अतिरिक्यांनी डोके वर काढले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षात निवडणूक मोहिमेतील दुसरी चर्चा
डेमॉक्रेटिक पक्षाची ही दुसरी मोठी चर्चा होती. रिपब्लिकन पार्टीने चार चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केवळ ७९ दिवसांमध्ये आयोवा राज्य राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडेल. राष्ट्राध्यक्षपदासाठी संपूर्ण अमेरिकेत नोव्हेंबर २०१६ मध्ये निवडणूक होणार आहे.

हिलरी बचावाच्या पवित्र्यात :
चर्चा देशांतर्गत मुद्द्यांवर होणे आवश्यक होते. मात्र, पॅरिसमधील हल्ल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आंतरराष्ट्रीय मुद्दे राहिले. पहिला अर्धा तास विदेश धोरणावर होता. हिलरी ओबामांच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले. हिलरी चर्चेदरम्यान बचावाच्या पवित्र्यात होत्या.त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी
मोठी प्रचार यंत्रणा राबविली आहे.