आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी ठरणार २२७ वर्षांतील पहिल्या महिला उमेदवार !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे तिकीट हिलरी क्लिंटन यांना मिळणे आता जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. कारण त्यांना पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या मोठी आहे. त्या जादुई संख्येजवळ पोहोचल्याचे सांगण्यात आले. तसे झाल्यास राष्ट्राध्यक्ष पदाचे तिकिट मिळवणाऱ्या ते २२७ वर्षांतील पहिल्याच महिला ठरतील.

माजी परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांना २ हजार ३८३ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिकच्या उमेदवारीसाठी ही अपेेक्षित संख्या झाली आहे. प्रायमरीमध्ये १ हजार ८१२ जणांनी त्यांचे समर्थन केले आहे. ५७१- सुपरडेलिगेट्सनीदेखील त्यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या सात महिन्यांत ७१४ जणांना विविध पाहणीतून हिलरींना पाठिंबा दिला होता. केवळ ९४ जणांनी पाठिंब्यावरील भूमिका स्पष्ट केली नाही. जुलै महिन्यात पक्षाचे संमेलन होणार आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिली पातळी जवळपास पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभवाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे डेमोक्रॅटिकचे सदस्य नॅन्सी वोर्ली यांनी सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हिलरी यांच्या नावावर इतिहास लिहिला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...