आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी क्लिंटन यांची ट्रम्प यांच्यावर ९ गुणांनी आघाडी, हिलरीच लोकप्रियतेत आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध ९ गुणांची आघाडी घेतली आहे, अशी माहिती ताज्या राष्ट्रीय ओपिनियन पोलमध्ये मिळाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीएनएन -ओआरसीच्या निवडणूक अंदाज पाहणीत क्लिंटन यांनी ५२ टक्के आघाडी घेतली असून या चुरशीच्या हेड टू हेड स्पर्धेत ट्रम्प यांना ४३ टक्के आघाडी आहे. म्हणजेच ९ गुणांच्या आघाडीवर हिलरी आहेत.

गेल्या निवडणूक पाहणी अंदाजापेक्षा यंदा क्लिंटन यांची ही आघाडी एकूण ७ गुणांनी वाढली आहे. ही पाहणी न्यूज नेटवर्क यांनी आयोजित केली होती. क्लिंटन यांच्या आघाडीचा अर्थ सरकारच्या धोरणांना जनतेने दिलेला पाठिंबा व अमेरिकेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, असा काढला जात अाहे. पूर्वीच्या निवडणूक अंदाज पाहणीत ट्रम्प यांना ४३ तर क्लिंटन यांना ४८ टक्के मते पडली होती. त्या वेळी अर्थात दोघांमधील टक्केवारीचा फरक पाहता क्लिंटन यांच्या यशाचा आलेख ७ गुणांवरून म्हणजेच ७ टक्क्यांवरून ९ गुणांवर चढला आहे. असे जरी असले तरी ट्रम्प यांनीदेखील आपला राजकीय प्रचाराचा कार्यक्रम फिलाडेल्फिया आणि क्लिव्हलॅँड भागात ठिकठिकाणी अनेक सभा घेऊन जारी ठेवला आहे त्यांची आघाडी नसली तरी हळूवारपणे त्यांचीही स्थिर वाटचाल सुरू आहे, असे सीएनएन -ओआरसी वाहिन्यांनी म्हटले आहे. सीबीएस न्यूजने आयोजित केलेल्या एका वेगळ्या निवडणूक अंदाज पाहणीत क्लिंटनच आघाडीवर असून त्या ७ गुणांनी आघाडीवर आहेत. हिलरींना मतदारांमध्ये ४६ टक्के पाठिंबा असून ट्रम्प यांना ३९ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. हिलरी क्लिंटन यांची लोकप्रियता अधिवेशनानंतर ४ गुणांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
पुढे वाचा...
>हिलरी या राक्षस : ट्रम्प
>‘पैशाचा अहंकार ’
बातम्या आणखी आहेत...