आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय विभाग हिलरींना पाठीशी घालतोय, ट्रम्प यांचा घणाघात; FBIच्या विरोधात काँग्रेसला पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- वादग्रस्तई-मेल प्रकरणात डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या न्याय विभागाकडून केला जात आहे, असा सनसनाटी आरोप रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

एफबीआयने हिलरी यांच्या विरोधात पुन्हा तपास करण्यास सुरूवात केल्याच्या दुसऱ्या दिवशी न्याय विभागाने एफबीआयच्या विरोधात काँग्रेसला एक पत्र लिहिले आहे. त्यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे संतापजनक विधान केले आहे. देशाच्या इतिहासात यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. न्याय विभागाने अशा पद्धतीची वागणूक देणे चुकीचे आहे. ही अतिशय खालच्या दर्जाची वागणूक आहे. म्हणूनच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आता या गोष्टी बदलल्या पाहिजेत, असे आवाहन ७० वर्षीय ट्रम्प यांनी केले आहे. फिनीक्स, अॅरिझोनामध्ये रविवारी ट्रम्प यांच्या जाहीर सभांचे आयाेजन करण्यात आले होते. त्या त्यांनी हिलरींवर अनेक आरोप केले. हिलरींना मतदान करणे म्हणजे भ्रष्टाचारापुढे शरणागती पत्करण्यासारखे होईल. त्याला मतदान केल्यासारखे ठरेल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

एफबीआयच्या उद्देशावर संशय
न्याय विभागाने ई-मेल प्रकरणात काँग्रेसला पत्र लिहून भूमिका मांडली आहे. त्यात निवडणुकीच्या तोंडावर तपास संस्थेच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण होतो. खात्याचा प्रोटोकॉल सांभाळण्यात आलेला नाही. त्यामुळे ही बाब चिंताजनक असल्याचे मत न्याय विभागाने काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

ट्रम्पला पछाडले, लोकप्रियतेत मात्र झाली घसरण
एफबीआयनेतपास सुरू करण्यात आल्याने हिलरी यांच्या लोकप्रियतेत काही प्रमाणात घट आल्याचे दिसून आली आहे. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत त्यांनी ट्रम्प यांना दोन गुणांनी पिछाडीवर टाकले आहे. पण लोकप्रियता गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरली आहे.

पुन्हा तपास माझ्यासाठी धक्कादायक : हिलरी अगोदरच्यातपासात काहीही निष्पन्न झाले नव्हते. आता एफबीआयने तपासाला पुन्हा सुरुवात केली आहे. ही गोष्टी ऐकून मला तर धक्काच बसला. एफबीआयची ही कृती माझ्या दृष्टीने त्रासदायक आहे, असे हिलरींनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...