आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरींना न्यूमोनिया; विश्रांतीचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनिया झाला आहे. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. आता त्यांना बरे वाटत आहे, पण त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अध्यक्षपद निवडणुकीतील त्यांची पश्चिम किनारा कॅलिफोर्नियातील प्रचार मोहीम त्यामुळे रद्द करण्यात आली आहे. यावर रिपब्लिकन पक्षाचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लवकरच बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. हिलरी क्लिंटन ९-११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या १५ वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास मध्येच सोडून निघून गेल्या होत्या. छायाचित्रात त्यांना थोडेसे लडखडताना पाहिले गेले होते. तिथून त्या सरळ आपली मुलगी चेल्सी यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्याबरोबरच्या मीडियालादेखील बराचवेळ याबाबत माहिती नव्हती.
बातम्या आणखी आहेत...