आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदानपूर्व चाचणीत हिलरी ४ अंकांनी आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांच्या पहिल्या थेट वादविवादानंतर राष्ट्रीय मतदानपूर्व चाचणी घेण्यात आली. यात डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार अंकांनी मात केली. ही चाचणी सीबीएस न्यूज नेटवर्क आणि द न्यूयॉर्क टाइम्सने संयुक्तरीत्या घेतली. हिलरींना यात ४५% मतदारांनी समर्थन दिले, तर ट्रम्प यांना ४१% मतदारांनी कौल दर्शवला. यापूर्वीची मतदानपूर्व चाचणी महिनाभरापूर्वी घेण्यात आली होती. यात दोन्ही उमेदवारांना ४२% मतदारांचा कौल मिळाला होता. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये क्लिंटन ३% मतांनी पुढे आहेत.

पहिल्या वादविवादानंतर
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांचा पहिला वादविवाद झाल्यानंतर क्लिंटन यांच्या बाबतीत मत चांगले झाले असल्याचे ३२ % मतदारांनी म्हटले आहे, तर ट्रम्प यांच्याकडे असणारा कल ३८% झाला आहे. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत ट्रम्प यांची लोकप्रियता १२% नी घसरल्याचे या चाचणीत दिसून आले.

प्रांतानुसार कौल
फ्लोरिडामध्ये क्लिंटन ५ अंकांनी पुढे आहेत. उत्तर कॅरोलिनामध्ये त्यांनी ३ अंकांनी सरशी केली आहे. पेन्सिल्व्हानिया येथे त्या ४ अंकांनी पुढे आहेत. आेहिआेमध्ये त्यांना प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत ५ अंक अधिक आहेत. हे चारही प्रांत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक गणले जातात.

रिअलक्लीअर पॉलिटिक्सने घेतला आढावा
विविध संस्थांनी केलेल्या राष्ट्रव्यापी चाचण्यांचा आढावा रिअलक्लिअर पॉलिटिक्स संस्थेने घेतला. यात सर्व दिग्गज संस्थांच्या मतदानपूर्व चाचणीच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. क्लिंटन यांना यात सरासरी कौल मिळाल्याचे दिसून आले. एकूण मतदारांचा कौल पाहता क्लिंटन यांना ३.१ % अधिक मते मिळाली असल्याचे दिसून येते. आले. पहिल्या थेट वादविवादानंतर क्लिंटन यांच्या बाजूने कल वाढल्याचे दिसून आले.

अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला : ट्रम्प
अमेरिकेवर २० खर्व अमेरिकन डॉलर्सचे कर्ज आहे. १०० खर्व परतावा न मिळणाऱ्या खर्चांचे आेझे आहे. अशी आकडेवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केली. व्यापारामध्येदेखील मोठी तूट असल्याचा दावा त्यांनी केला. दरवर्षी ८०० दशलक्ष डॉलर्सची तूट आहे.
बातम्या आणखी आहेत...