आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी ठरल्या पहिल्या महिला उमेदवार, रचला नवा इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - न्यू जर्सी, न्यू मेक्सिकोमधील प्राथमिक टप्प्यातील समर्थनानंतर हिलरी क्लिंटन यांचा डेमोक्रॅटिकच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील त्या पहिल्याच महिला उमेदवार ठरणार आहेत.

देशाच्या इतिहासात प्रथमच महिला एका महत्त्वाच्या पक्षाची उमेदवार होणार आहे. आपण सर्वांनी हा मैलाचा दगड गाठला आहे. सर्वांचे आभार, अशा शब्दांत हिलरी क्लिंटन (६८) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बुधवारी डेमोक्रॅटिक पार्टीच्या ब्रुकलिनमधील प्रचार मुख्यालयात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी हिलरी यांना २ हजार ३८३ सदस्यांचे समर्थन मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. हिलरी यांच्या प्रचार मोहिमेमुळे हजारो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी त्यांनी कित्येक वर्षे केलेल्या संघर्षाचे हे फलित आहे, असे व्हाइट हाऊसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. हिलरींनी आपल्या प्रचारात ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प अमेरिका व मेक्सिको यांच्यात भिंती उभारण्याचे काम करत नाहीत, किंबहुना ते अमेरिकेतील जनतेमध्ये आपसात भिंती बांधू पाहत आहेत. तुम्ही-आम्ही मिळून मोठी ताकद आहोत, यावर ट्रम्प यांचा विश्वास नाही. त्यांनी सातत्याने प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिला. कठीण प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर हल्ले केले. भीती दाखवून विजय मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच ट्रम्प नेतृत्वासाठी योग्य नाहीत, असा आरोपही क्लिंटन यांनी केला आहे.
पुढे वाचा...
>'फर्स्ट लेडी' ते फर्स्ट लेडी
>नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांच्याशी मुकाबला
>‘माेठी स्वप्ने पाहणारी कोणतीही मुलगी होईल राष्ट्राध्यक्ष’
बातम्या आणखी आहेत...