आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरीच योग्य उमेदवार, आेबामा यांचे समर्थन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - हिलरी क्लिंटन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीला बराक आेबामा यांनी आैपचारिक पाठिंबा जाहीर केला. क्लिंटनच या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिलरी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार आहेत. पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनीही हिलरी यांची उमेदवारी मान्य केली आहे.
राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅट नेते आेबामा यांनी गुरुवारी सँडर्स यांची भेट घेतली. त्यानंतर फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमध्ये आेबामांनी आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एवढा योग्य उमेदवार कोणी पाहिला असेल असे मला तरी वाटत नाही. मी त्यांच्यासोबत आहे. हिलरी यांच्या प्रचाराची मोहीम सुरू करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. ही प्रतीक्षा मला अडचणीची वाटू लागली आहे. हिलरी यांना दोन दिवसांपूर्वीच उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला. २ हजार ३८३ सदस्यांचे समर्थन मिळाले आहे. त्यानंतर हिलरींनी आपला दावा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...