आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिलरी म्हणाल्या ,‘खासगी ई-मेलबद्दल आय अॅम सॉरी; मोठी चूकच होती ’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - परराष्ट्रमंत्री असताना मी खासगी ई-मेलचा वापर केला होता. ही आपली चूक होती, अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जाहीरपणे पश्चात्ताप व्यक्त केला.

सार्वजनिक जीवनात जाहीरपणे चुकीची माफी मागण्याची राजकीय परंपरा फारशी पाळलेली दिसत नाही. मात्र, पुढारलेल्या देशांत हा मोकळेपणा त्यांचे वेगळेपण ठसवणारा ठरतो. त्याचाच प्रत्यय हिलरी यांनी बुधवारी जाहीरपणे मागितलेल्या माफीवरून आला. विरोधकांनी त्यांना सरकारी पदावर असताना खासगी ई-मेल अकाउंट वापरल्याबद्दल निवडणूक प्रचारादरम्यान जेरीस आणले होते. त्यांना माफी मागण्याची कोणतीही सक्ती नव्हती; परंतु त्यांच्या प्रचार मोहिमेला या वादाचा फटका बसत असल्याने चूक नसतानाही त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा कबुलीनामा दिला आहे.

कायद्याचा भंग नाही
मला दोन अकाउंट वापरण्याची त्या वेळी परवानगी मिळाली होती. त्यामुळे ती कृती कायद्याचा भंग करणारी नव्हती, असा दावा क्लिंटन यांनी केला. मी खासगी ई-मेल वापरत होते. याची कल्पना सरकारमधील सर्वानाच होती. सरकार त्याबाबत अनभिज्ञ नव्हते; परंतु सर्वानीच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याबद्दल मी सर्वाची माफी मागते. तो निर्णय योग्य नव्हता. त्याबद्दलची जबाबदारी मी घेतली पाहिजे, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे.

दोन अकाउंटची परवानगी
वास्तवात दोन ई-मेल अकाउंट वापरण्याची हिलरी यांना परवानगी होती. त्यापैकी एक अकाउंट त्या खासगी कामासाठी, तर दुसरे अकाउंट आपल्यावरील परराष्ट्र खात्यासाठी वापरत.

लोकप्रियतेवर परिणाम
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई-मेल वादंगाचा परिणाम गेल्या काही महिन्यांपासून दिसून आला आहे. क्लिंटन यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. परंतु ई-मेल वादंगामुळे त्यांची मोहीम डागाळू लागली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या लोकप्रियतेमध्येदेखील घसरण झाल्याने डेमोक्रॅटिक पार्टी हादरली होती.
समर्थकांशी साधला संवाद
क्लिंटन यांनी कबुली व्यक्त केल्यानंतर तत्काळ आपल्या समर्थकांशी संवाद साधला. विरोधकांनी रान उठवले असले तरी खासगी ई-मेल वापरून काहीही गैर केले नसल्याचे त्यांनी नमूद केले.