आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प समर्थकांना वाईट संबोधत हिलरी वादात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक शाब्दिक बाणाची जणू स्पर्धाच लागली आहे. याचे विपरीत परिणाम समोर येताच उमेदवारांकडून माफीही मागितली जात आहे. डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्ध्या समर्थकांना “वाईट लोकांचा समूह’ ही उपमा दिली. वाद वाढल्यानंतर त्यांनी रविवारी माफी मागितली. मात्र, त्याचबरोबर तिरकस समाचारही घेतला.
अमेरिकेच्या माजी प्रथम नागरिक माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन म्हणाल्या, गेल्या रात्री मी खूप जास्तच सामान्य झाले होते. हा काही चांगला विचार नव्हता. मी 'अर्धे...’ म्हटले, हे चुकीचे होते. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या, मी कट्टर वांशिक मुद्द्यांवर लहरी व्यक्तींचा विरोध करतच राहील.
ओबामा यांनी अशीच टिप्पणी केली होती : हिलरीयांची टिप्पणी नवी बाब नाही. २००८ च्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्या “बंदूक आणि धर्म’वरून २०१२ मध्ये मिट रोम्नीच्या '४७ टक्के’ यासारख्या टिप्पणीनेही वाद निर्माण झाला होता.
मात्र तरीही पुन्हा बोलल्या :
बोलाचालीची भाषा पाहिली तर ट्रम्प यांच्या अर्ध्या समर्थकांना मी वाईट लोकांचा समूह, असे जे बोलले ते तुम्हीही बोलाल. तुम्ही त्यास वंश, लिंगभेद, होमोफोबिक किंवा विदेशी नागरिकांना भ्यायलेले लोक किंवा इस्लामला भीत असलेले लोक म्हणू शकता. हिलरी म्हणाल्या, दुर्दैवाने त्यांनी अशा लोकांचीच मदत केली. त्यांना आवाज दिला. ज्यांची वेबसाइट ११,००० पाहत होते, आता ती १.१ कोटी लोक पाहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...