आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची कृत्रिम मुत्सद्देगिरी, हिलरी क्लिंटन यांची घणाघाती टिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोला हेतुपूर्वक भेट देऊन अडचणीत टाकणारी आंतरराष्ट्रीय घटना कृत्रिमरीत्या घडवून आणली. त्यांची ही भेट दुर्दैवीच होती, डेमाेक्रॅटिक पक्षाचे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार हिलरी क्लिंटन मंगळवारी येथे म्हटले आहे.त्या एका मुलाखतीत बोलत होत्या. ट्रम्प नेतृत्व करण्यास अयोग्य आहेत.

काही तासातच त्यांनी मेक्सिकोचा दौरा आयोजित केला आणि अमेरिकेला अडचणीत आणणारी घटना घडली. खरे तर अध्यक्षपदाचा उमेदवार असलेले ट्रम्प मुळी असे परदेशात जाऊच शकत नाहीत आणि तिथल्या अध्यक्षांशी तर असे भेटणे दूरच त्यांच्या या भेटीनंतर मेक्सिकोच्या अध्यक्षांशी त्यांचे झालेले ट्विटर युद्ध तर सर्वांना माहितीच आहे. यावरून त्यांची अपरिपक्वता सिद्ध होते. रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टीम कायनेदेखील मुलाखतीत सहभागी झाले .

नवी निवडणूक नीती : हिलरीसध्या टीकेला सामोऱ्या जात असल्याने त्या माध्यमांना टाळताहेत, असे वाटत असतानाच त्यांनी माध्यमांसह, सभांना संबोधित करण्याचे नवे निवडणूक प्रचार मोहीम धोरण आखले आहे. त्यांनी प्रथमच २७५ दिवसांनंतर पत्रपरिषद ठेवली होती.
बातम्या आणखी आहेत...