आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या चर्चेत हिलरींची सरशी; कर, दहशतवादावर वाद, ९० मिनिटांत अनेक मजेशीर प्रश्नोत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी परंपरेनुसार राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराचा एक अविभाज्य भाग असलेला उमेदवारांतील पहिला समोरासमोरील वादविवाद सामना नुकताच पार पडला. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निर्विवाद सरशी मिळवली आहे. बहुचर्चित पहिल्या फेरीत मंगळवारी (ता.२७) विजयी झाल्या. सुमारे ६२ टक्के मतदारांनी आपले मत हिलरींच्या पारड्यात टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांना फक्त २७ टक्केच मते पडली. ही मते टीव्हीवरून हा वादविवाद थेट पाहणाऱ्यांनी दिलेली होती.
पहिल्या ६८ वर्षीय हिलरी क्लिंटन यांनी ७० वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने मुद्देसूदपणे आपला दृष्टिकोन आणि मते व्यक्त केली. त्यांना अमेरिकेपुढील प्रश्नांची अधिक गंभीरपणे जाण आहे, असे दिसल्याने हिलरींनी ही फेरी दोनास एक या फरकाने जिंकली, असा दावा मतदान निकालानंतर सीएनएन - ओआरसी या वाहिन्यांनी केला. चर्चेत अनेकदा व्यक्तिगत हल्ले झाले. साधारणत: नेक टू नेक स्पर्धा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता; पण तसे घडले नाही. गेल्या महिन्यातील निवडणूक अंदाज मत कलचाचणीत गुण पिछाडीवर असतानाही गुणांचा पाठलाग करत ट्रम्प यांनी स्पर्धा रंगतदार केली होती.
६२% लोकांनाअसे वाटते की, क्लिंटनच उत्तमपणे हे परकीय धोरण सांभाळतील.
३५% लोकट्रम्पयांचे समर्थन करतात.
६०-४० अशाप्रमाणात प्रत्येक मुद्द्यावर मते पडत आहेत. ५० टक्के लोकांच्या मते या वादचर्चेचा मतदारांच्या भूमिकेवर काहीही प्रभाव पडत नाही.

आज यांच्यात करपरती, रोजगार, दहशतवाद यावर जंगी वादविवाद झाला आणि त्यात हिलरींनी ट्रम्प यांना बचावात्मक पातळीवर जाण्यास भाग पाडले. ट्रम्प म्हणाले, मी माझे टॅक्स रिटर्न सादर करतो मात्र तसेच हिलरींनी त्यांच्या समर्थनाची ३३ हजार ई-मेल्स सादर करावीत. हिलरींनी ट्रम्प यांना महिलाविरोधी अशी टिप्पणी दिली आहे. त्या म्हणाल्या, मी देशासाठी १२२ देशांत फिरले आहे. मला अनुभव आहे दहशतवाद मला माहिती आहे. ट्रम्प यांच्याकडे इसिसला नेस्तनाबूत करण्याचा कुठलाही आराखडा नाही.

९० मिनिटांच्या या वादचर्चेत मजेशीर प्रश्नोत्तरे झाली. काही व्यक्तिगत प्रश्नही विचारले गेले. त्यात हिलरींची प्रकृती आणि क्षमता यावर पुनरुक्ती करत ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले. तसेच त्यांना नुकत्याच झालेल्या न्यूमोनियावरही प्रश्न विचारले. हिलरींनीदेखील ट्रम्प यांच्या नेतृत्व गुणावरच शंका व्यक्त केल्या.

मीडिया : शांत क्लिंटनविरुद्ध गोंधळलेले ट्रम्प
हिलरींनी मंगळवारी स्वत:ला अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भावी विजयी उमेदवाराच्या स्वरूपात ट्रम्प यांच्याविरोधात सादर केले आहे. त्या ट्रम्प यांच्या तुलनेत अधिक शांत-ज्ञानी आत्मविश्वासी अराजकीय वाटत होत्या. वॉशिंग्टन पोस्टने लिहिले आहे की, या चर्चेने खूप लोकांना आकर्षित केले. मात्र या पहिल्या चर्चेत रिपब्लिकन नीती पूर्णत: अपयशी ठरली. ट्रम्प नेतृत्वासाठी सक्षम नाहीतच. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, ट्रम्प हे सातत्याने असहनशीलता आणि राजकीय अपरिपक्वता दाखवतात.
बातम्या आणखी आहेत...