आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी क्लिंटन यांच्या मागे चौकशीचे पुन्हा शुक्लकाष्ठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या केवळ ११ दिवस अगोदर डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या मागे पुन्हा चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांच्या विरोधातील अन्य एका ई-मेल प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. एफबीआयने त्याची साधी कल्पनाही व्हाइट हाऊस किंवा परराष्ट्र विभागाला दिली नाही. आठ संसदीय समितींच्या अध्यक्षांना त्याबद्दल सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सगळे अध्यक्ष रिपब्लिकन आहेत.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या केवळ ११ दिवस अगोदर डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या मागे पुन्हा चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.

च्याविरोधातील अन्य एका ई-मेल प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. एफबीआयने त्याची साधी कल्पनाही व्हाइट हाऊस किंवा परराष्ट्र विभागाला दिली नाही. आठ संसदीय समितींच्या अध्यक्षांना त्याबद्दल सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सगळे अध्यक्ष रिपब्लिकन आहेत.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पेनसिल्व्हानियात पत्रकारांना बिल क्लिंटन यांची भेट घेऊ दिली नाही. हतबल हिलरी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरही देऊ शकल्या नाहीत. परंतु वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साडेचार तासांनंतर डेस मोइनेसमध्ये पत्रकार परिषद घेऊन एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांच्यावरील आपला संताप जाहीरपणे व्यक्त केला. माझ्याविरोधातील आधीच्या प्रकरणासारखाच या तपासाचाही निकाल येईल. मला विजयाबद्दल शंका वाटत नाही. म्हणूनच कोमी यांनी अमेरिकेच्या जनतेला सर्वकाही सांगून टाकले पाहिजे. ते आठ समितींच्या अध्यक्षांना भेटले. त्यांच्याशी झालेला संवाद जनतेसमोर मांडण्यात यायला हवा, असे हिलरी म्हणाल्या.

वारंवार विचारता म्हणून सांगतो
एफबीआयचे संचालक कोमी संसदीय समितीच्या अध्यक्षांशी म्हणाले, तुम्ही वारंवार आमच्या तपासावर संशय व्यक्त करत आहात. त्यामुळे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. हे स्पष्ट करायचे आहे. हे प्रकरण हजार ई-मेलशी संबंधित प्रकरण आहे. या प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे, असे माझे सहकारी सांगतात. त्यास मी परवानगी दिली आहे. त्यात काय निष्पन्न होईल हे मला ठाऊक नाही. कदाचित मागील तपासाशी त्याचा संबंध असावा.
बातम्या आणखी आहेत...