आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिलरी क्लिंटन यांचा प्रचार १३ जूनपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिकच्या उमेदवारीसाठी आघाडीच्या दावेदार हिलरी क्लिंटन यांनी १३ जूनपासून प्रचारास सुरुवात करणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. हिलरी यांंच्या खासगी कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली.

१३ जून रोजी त्यांची पहिली सभा होणार असल्याने अमेरिकेत उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिल्या सभेचे आयोजन मोठ्या पातळीवर केले जाणार आहे. गेले काही आठवडे त्यांनी इआेवा, न्यू हॅम्पशायरसारख्या छोट्या राज्यांचा दौरा केला. तेथे उद्योजकांच्या भेटी घेतल्या. पक्षांतर्गत मतदानामध्ये येथील मतदारांचा वाटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे त्यांनी भेटीगाठींवर भर दिला होता.
बातम्या आणखी आहेत...