आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hillary Is Best Contender For US President : Obama

अध्यक्षपदासाठी हिलरी योग्य उमेदवार, सक्षम अध्यक्ष ठरतील, ओबामांकडून स्पष्ट संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनामा - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी पक्की मानली जात असून दस्तुरखुद बराक ओबामा यांनीही त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या सर्वोत्तम महिला अध्यक्ष ठरतील, असे ओबामांनी म्हटले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी हिलरी यांचे नाव आघाडीवर आहे. हिलरी यांना उमेदवारी देण्यामागे या पक्षाचे दोन उद्देश आहेत. एक तर हिलरी या माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी असल्याने अध्यक्षपदाच्या जबाबदारीची त्यांना पुरती जाणीव आहे. शिवाय, अमेरिकेला महिला अध्यक्ष निवडून देण्यासाठी त्यांच्यापेक्षा उजवी दुसरी उमेदवार अमेरिकेत नाही.ओबामा २००८ मध्ये अध्यक्षपदासाठी प्रथम निवडून आले. तेव्हा हिलरी परराष्ट्र मंत्री होत्या. त्या काळातच ओबामांनी हिलरीच अध्यक्षपदाच्या सक्षम उमेदवार आहेत, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.