वॉशिंग्टन - अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन रविवारी (१२ एप्रिल) राष्ट्राध्यक्षपदासाठी
आपल्या उमेदवारीचा दावा जाहीर करण्याची शक्यता आहे.
हिलरी यांनी २००८ मध्येदेखील दावेदारी केली होती, परंतु त्या वेळी बराक आेबामा यांच्या स्पर्धेत त्या मागे पडल्या होत्या. हिलरी यांच्या टीमने ब्रुकलिन येथे कार्यालय सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे, असे ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. आगामी निवडणुकीसाठी तेथे त्यांना बहुदा प्रचारासाठी मुख्यालय सुरू करायचे आहे, असे वृत्तपत्राचे म्हणणे आहे. वास्तविक हिलरी यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.