आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी, ट्रम्प यांचा पराभव; बढत मात्र अजूनही कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठीच्या निवडणुकीत माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन आणि उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. व्योमिंगमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणुकीत बर्नी सँडर्स यांनी क्लिंटन यांचा, तर कोलोरॅडोमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुकीत टेड क्रुझ यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. मात्र, हिलरी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची आपापल्या पक्षातील बढत अद्यापही कायम आहे. वर्मोटमधून सिनेटर असलेले सँडर्स यांचा हा ९ निवडणुकांमधील आठवा विजय आहे. यानंतरची निवडणुकी १९ एप्रिल रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

डेमोक्रॅटिक पक्ष
४,७६३ एकूण डेलिगेट
२,३८३ मते विजयासाठी आवश्यक
हिलरी क्लिंटन : १,७५६
(४६९ सुपर डेलिगेटसह)
बर्नी सँडर्स : १,०६८ (३१ सुपर डेलिगेटसह)

रिपब्लिकन पक्ष
२,४७२ : एकूण डेलिगेट
१,२३६ : विजयासाठी आवश्यक
डोनाल्ड ट्रम्प : ७४३
टेड क्रुझ : ५४५
जॉन केसिक : १४३