आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK च्‍या माजी परराष्‍ट्रमंत्री हिना म्‍हणाल्‍या, \'युद्ध करून पाक काश्मीर घेऊ शकत नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकच्‍या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी काश्मीरच्या मुद्द्यासंदर्भात बेताल वक्‍तव्‍य करणा-या पाक नेत्‍यांना सुनावले आहेत. 'भारताशी युद्ध करून पाकिस्तान काश्मीर कधीच घेऊ शकत नाही, असे त्‍या म्‍हणाल्‍या 'जियो न्यूज'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.
काय म्‍हणाल्‍या खार..
- 'भारताशी युद्ध करून पाकिस्तान काश्मीर घेऊ शकत नाही हे वास्तव आहे.
- अशा स्थितीत पाककडे चर्चा हाच एक चांगला पर्याय आहे.
- चर्चेच्या माध्यमातून आपण दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करू शकतो.
- परस्परांबद्दल विश्वासच दोन्‍ही देशांना तोडग्यापर्यंत पोहोचू शकतो.
पाकिस्तानमध्‍ये पीपल्स पार्टीची सत्ता असताना आम्ही भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला होता. व्हिसाचे नियम शिथील करून दोन्ही देशांमधील व्यापारालाही चालना दिली होती, असे मत खार यांनी मांडले.
पाकिस्‍तानच्‍या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, पाकचे परराष्ट्र कार्यालय एक राजकीय कार्यालय झाले आहे. दुसऱ्या देशांकडील पुष्पगुच्छ पाकच्या पंतप्रधानांकडे पाठवण्याचे काम आमचे परराष्ट्र खाते सध्या करत आहे. सध्‍याचे परराष्‍ट्र धोरण हे केवळ प्रतिक्रीया देण्‍यापूरते मर्यादित आहे असे, त्‍या म्‍हणाल्‍या.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, खार यांनी या मुद्द्यांवरही टाकला प्रकाश..
बातम्या आणखी आहेत...