आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Priest Killed In Bangladesh, Isis Claims Responsibility

बांगलादेशात कट्टरवाद्यांचा मंदिरावर हल्ला, एकाची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांनी रविवारी एका मंदिरावर हल्ला करून पुजाऱ्याची गळा आवळून हत्या केली. गोळीबारात दोन भाविक जखमी झाले.

ढाक्याहून ४९५ किमी उत्तरेला पंचगढजवळील देवीगंज मंदिरातील ही घटना आहे. मोटारसायकलहून आलेल्या तीन हल्लेखोरांनी मंदिरावर दगडफेक केली. ५० वर्षीय पुजारी जजनेश्वर रॉय बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. हल्ल्याच्या मागे बंदी असलेली जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशचा हात असावा, असे पंचगडचे पोलिस प्रमुख गियासुद्दीन अहमद यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. सुन्नी मुस्लिम बहुल बांगलादेशात गेल्या काही महिन्यांत अल्पसंख्यात हिंदुंना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. अशा घटनांत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू तर सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही मंदिरांवर हल्ले झाले.