आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला, प्रवेशद्वारावर काढले सैतानाचे चित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. नॉर्थ टेक्सास येथील एका मंदिराची तोडफोड करुन मंदिराच्या प्रवेशद्वारावर सैतानाची पूजा सुरु असल्याचे चित्र काढण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मंदिर परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्या गँगचे प्रतिक देखील काढले आहे. मंदिराच्या दरवाजावर 666 लिहिण्यात आले आहे. हे देखील गँगचे प्रतिक असण्याची शक्यता आहे.
मंदिराच्या दरवाजावर तयार करण्यात आलेले चिन्ह इंटरनॅशनल कॅथोलिक गँग मारा सलवटरुचा यांचे असल्याचे समजते. ही गँग मुख्यतः सल्वाडोर येथील असून आता अमेरिकेतही सक्रिय झाली आहे. मंदिरावरील हल्ल्यानंतर पोलिस अमेरिकन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गुप्तहेरांना सतर्क करण्यात आले आहे. ज्या मंदिरावर हल्ला झाला ते हायलँड येथील रहिवासी आहेत. मंदिराचे प्रशासकीय बोर्ड सदस्य कृष्णा सिंह म्हणाले, हा हल्ला आमच्यासाठी फार दुःखद आहे. हिंदू मंदिरावरील हल्ल्यानंतर आता बराक ओबामा सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की एकीकडे ओबामा प्रशासन भारतात होत असलेल्या धार्मिक हिंसाचारावर चिंता व्यक्त करते आणि आता त्यांच्याच देशात हिंदू मंदिरांवर हल्ले होत आहेत तेव्हा सरकारने मौन बाळगले आहे.
मंदिरावरील हल्ल्यानंतर त्या भागातील गैरहिंदू संघटना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यासाठी अमेरिकेतील हिंदू नेते राजन जेड यांनी धन्यवाद दिले आहेत.