आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Temple Vandalised In Us Hate Message Spray Painted On Wall

अमेरिकेत महाशिवरात्रीआधी हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतीवर लिहिले \'गेट आऊट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात अज्ञात लोकांनी एका मोठ्या हिंदू मंदिराची तोडफोड केली आणि मंदिराच्या भिंतीवर 'गेट आऊट' लिहिले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. वॉशिंग्टनमधील सिऍटल मेट्रोपोलिटन भागात हे मंदिर आहे. उत्तर-पश्चिम अमेरिकेतील हे सर्वात मोठे हिंदू मंदिर असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात लोकांनी मंदिराच्या भिंतीवर स्प्रे करुन स्वास्तिक काढले आणि पेंटने 'गेट आऊट' लिहिले. बोथेल येथील हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष नित्य निरंजन यांनी म्हटले आहे, की हा देश स्थलांतरितांचा देश आहे. अशा घटना अमेरिकेत घडायला नको. येथून कोणालाही निघून जा, असे सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि असे सांगणारे तुम्ही कोण? मंदिरात सध्या महाशिवरात्रीचा उत्सव सुरु आहे. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) या घटनेचा निषेध केला आहे.
एचएएफने या घटनेची कसून चौकशीची मागणी केली आहे. हिंदूचा महत्त्वाचा सण महाशिवरात्री आधी अशा प्रकारची घटना होणे योग्य नाही, असे एचएएफचे कंसारा यांनी म्हटले आहे. त्यांनी या घटनेचा तपास विशेष पथकाकडून होण्याची विनंती केली आहे. बॉथेल शहराचे पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. सिऍटल मेट्रोपोलिटन भागात या मंदिराची निर्मीती दोन दशकांपूर्वी करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून अमेरिकेत हिंदू मंदिरांच्या विद्रूपीकरणाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्य वर्षी व्हर्जीनिया येथील लोऊडोऊन काउंटी आणि जॉर्जिया येथील मोनरो येथे अशाच घटना घडल्या होत्या.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंदिराच्या भिंतीवर चितारण्यात आलेला वादग्रस्त मजकूर