आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindujas Displaced From Top Spot Of Britain's Rich List

ब्रिटनच्या गर्भश्रीमंतांमध्ये ३५ भारतवंशीय व्यक्ती, हिंदुजा दुसऱ्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्या गर्भश्रीमंतांच्या यादीत भारतवंशीयांची संख्या वाढून ३५ झाली आहे. उद्योगपती हिंदुजा बंधू श्रीचंद आणि गोपीचंद यांची ब्रिटनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ही आेळख आता राहणार नाही. कारण यादीत त्यांची घसरण होऊन ते दुसऱ्या स्थानी आले आहेत. त्यांच्याकडे १.२३ लाख कोटी रुपये संपत्ती आहे. युक्रेनचे लेन ब्लावत्निक १.३० लाख कोटी रुपयांच्या मालकीसह अव्वलस्थानी पोहोचले आहेत. लक्ष्मीनारायण मित्तल तिसऱ्या स्थानावरून सातव्या स्थानी आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८७, ४०० कोटी रुपये आहे. लॉर्ड स्वराज पॉल ४७ व्या स्थानी कायम आहेत. त्यांची संपत्ती १९०० कोटींहून २०, ९०० कोटी झाली आहे.

हिंदुजा बंधू यांच्या संपत्तीत ९,९७५ कोटी रुपयांनी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हिंदुजा यांच्या मुलाचा शाही विवाह झाला होता. त्यावर १४२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हिंदुजा बंधूंनी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडची ज्वेलरी आणि डायमंड फायनान्सिंग बिझनेसचीही खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांंच्यावर ४,७५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ‘संडे टाइम्स’ च्या यादीत हा दावा करण्यात आला आहे. वृत्तपत्राने हजार सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंब यांच्या संपत्तीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार आगामी दहा वर्षांत ब्रिटनमधील श्रीमंतांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होईल. किमान ९५० कोटी रुपये असलेल्या व्यक्तींनाच यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ८०७ कोटी रुपये मर्यादा ठेवली होती.

महाराणी ३०० मधून बाहेर
महाराणीएलिझाबेथ द्वितीय १९८९ मध्ये ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होत्या. परंतु ताज्या यादीत त्या ३०२ स्थानावर आहेत. त्यांच्या नावावर हजार २३० काेटी रुपयांची संपत्ती आहे.

जॉर्ज क्लूनीदेखील यादीत
हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि त्यांची पत्नी अमाल यांचेही नाव यादीत समाविष्ट आहे. उभयतांच्या नावावर १, १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे सेलिब्रिटी जोडपे नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असते.

ब्लावत्निक यांचे ३९० कोटी रुपयांचे लंडनमध्ये घर
जगातीलसर्वात श्रीमंत व्यक्ती ब्लावत्निक यांच्याकडे तेल, धातू, संगीत आणि डिजिटल मीडियासंबंधी उद्योग आहेत. १९७८ मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेत गेले होते. लंडनमध्ये त्यांचे ३९० कोटी रुपयांचे घर आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्लावत्निक स्कूल ऑफ गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी ७१२ कोटी रुपये दान दिले.

यादीत नवीन भारतीय
संडे टाइम्सच्या यादीत पाच नवीन भारतवंशीय चेहरे पाहायला मिळतात. आशिष ठक्कर, उद्योगपती गौतम थापर, फूड उद्योग सम्राट बलजिंदर बोपरन, फॅशन ट्रेडर नितीन पासी, अर्थसेवातज्ज्ञ लॉर्ड वेरजी.

{११७ लोकांकडे एक अब्ज पाउंडहून अधिक संपत्ती
{ १०४ अब्जाधीश २०१४ च्या यादीत
{ हिंदुजा बंधूंकडे १.२३ लाख कोटी रुपयांची संपत्ती-दुसऱ्या स्थानी,
{ एलएन मित्तल-८७, ४०० कोटी रुपये-सातवे स्थान,
{ लॉर्ड स्वराज पॉल-२०, ९०० कोटी रुपये-४७ वे स्थान