आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindus To Be Worlds Third Largest Population By 2050 Report

2050 पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम, हिंदूंची संख्या 34 टक्क्यांनी वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉश्गिंटन - वर्ष 2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या तिसर्‍या क्रमांकावर असेल तर, जगातील सर्वाधिक मुस्लिमांची संख्या ही भारतात असणार आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आलेल्या एका संशोधनातून हा खुलासा झाला आहे. या संशोधनानुसार, भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या इंडोनेशियाला देखील मागे टाकेल आणि सर्वाधिक मुस्लिम असलेला जगातील क्रमांक एकचा देश बनेल. या संशोधनात म्हटले आहे, की 2050 मध्ये भारतातील सर्वाधिक लोक हे हिंदू असतील.
2050 मध्ये 1.4 अब्ज होतील हिंदू
पीयू रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनात म्हटले आहे, की 2050 मध्ये भारतातील हिंदूंची लोकसंथ्या 34 टक्क्यांनी वाढू ती जवळपास 1.4 अब्जांपर्यंत पोहचेल. तर त्याचवेळी जगाच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंची संख्या 14.9 टक्के राहील. याच पद्धतीने हिंदूंची संख्या वाढली तर कोणत्याच धर्मावर विश्वास नाही असे माननार्‍यांना (नॉन बिलिव्हर्स) मागे टाकेल. 2050 पर्यंत नॉन बिलिव्हर्सची लोकसंख्या 13.2 टक्के होणार आहे. ती हिंदूंपेक्षा कमी असेल.
ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये जास्त अंतर नाही
या संशोधानानुसार, पुढील चाळीस वर्षांमध्ये ख्रिश्चनांची संख्या जगात सर्वाधिक होईल, मात्र मुस्लिम त्यांच्यापेक्षा फार मागे नाहीत. त्यांचीही लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या संशोधनानुसार अंदाज वर्तवण्यात आला आहे, की 2050 पर्यंत मुस्लिमांची वाढ होऊन संख्या 2.8 अब्जांपर्यंत जाईल आणि ख्रिश्चन 2.9 अब्ज असतील. एकूण लोकसंख्येच्या ते अनुक्रमे 30 आणि 31 टक्के असतील. त्यामुळे त्यांच्यात फार फरक नसणार आहे.