आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७९ वर्षांच्या रुग्णावर १९ मिनिटांत शस्त्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हँकुव्हर - थकत्या वयात गंभीर हृदयशस्त्रक्रियेचा विचारही नकोसा वाटतो. त्यात हृदयविकाराचा झटका आल्याबरोबर शस्त्रक्रिया करणे तर आणखीच जोखमीचे. परंतु अमेरिकेत ७९ वर्षीय मॅक्स मॉर्टोन यांच्यावर अशी यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तीदेखील केवळ १९ मिनिटांत. डॉक्टरांच्या या तत्परतेची आरोग्य विश्वात चर्चा आहे.

उत्तर अमेरिकेतील ही घटना आहे. मॅक्स यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. अशा अवस्थेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यास ते जीवावर बेतू शकते. परंतु व्हँकुवर सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने हे आव्हान स्वीकारले. मॅक्स यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. विना आेपन हार्ट सर्जरीचा धोका न पत्करता त्यांनी मॅक्स यांची नलिका बदलली. ही शस्त्रक्रिया केवळ १९ मिनिटांत पूर्ण करण्यात आली. ११ मार्च रोजी मॅक्स डॉक्टरांना भेटायला आले तेव्हा त्यांचा व्हॉल्व्ह बिघडला होता. त्यावेळी ते शुद्धीवर होते. त्यांचा रक्तदाब कमी होता आणि गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्ताचा शरीरात पुरवठा होत होता. अशा परिस्थितीत सामान्य शस्त्रक्रिया जोखमीची ठरली असती. म्हणून डॉक्टरांनी ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रोसेस करण्याचे ठरवले. रुग्णालयाच्या सेंटर फॉर हार्ट व्हॉल्व्ह इनोव्हेशनने दहा वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान शोधून काढले होते.
हृदय शस्त्रक्रियांसाठी नव्या युगाची सुरुवात
> मॅक्स यांच्यावरील शस्त्रक्रियेचे श्रेय सेंटर फॉर हार्ट व्हॉल्व्ह इनोव्हेशनला दिले जाते. या सेंटरने जगात पहिल्यांदाच टीएव्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता. हृदयावरील उपचारात ही नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. भविष्यात होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी हे मार्गदर्शक ठरेल. डॉ. जॉन वेब आणि डॉ. रिचर्ड कूक यांना त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. - डॉ. डेव्हिड वूड (सर्जरी टीम)
बातम्या आणखी आहेत...