आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historical Monuments And Temples Destroyed In Nepal Earthquake

या वास्तू होत्या काठमांडूची ओळख, बघा भुकंपापूर्वीचे आणि नंतरचे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी 25 एप्रिल रोजी नेपाळमध्‍ये आलेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 80 वर्षांतील हा सर्वांत भयंकर भूकंप होता. यात नेपाळच्या अनेक प्राचिन आणि ऐतिहासिक वास्तूंना नुकसान पोहोचले होते. यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केले होते. काठमांडूतील अनेक मनोरे आणि मंदिर यांचे नुकसान झाले होते. या वास्तूच काठमांडूची खरी ओळख होत्या.

धारहारा टॉवर विदेशी पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. याला भीमसेन किंवा मिनार टॉवर असेही म्हटले जायचे. याला नेपाळमधील कुतुबमिनिर असे म्हटले जायचे. गेल्या 180 वर्षांपासून या टॉवरला कोणतीही क्षती पोहोचलेली नव्हती. 1932 मध्ये नेपाळचे पंतप्रधान भीमसेन थापा यांनी याचे निर्माण केले होते. त्यानंतर महाराणीला भेट दिला होता. 1943 मधील भूकंपातही याचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा याची निर्मिती करण्यात आली होती.

काठमांडूत तीन दरबार स्केअर प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील शाही परिवाराचे हे ओळख होते. भूकंपाला यांचे मोठे नुकसान झाले होते. येथील अनेक ऐतिहासिक मंदिरेही जमिनदोस्त झाले होते.

पुढील स्लाईडवर बघा, भूकंपापूर्वी कशा दिसत होत्या या वास्तू... भूकंप आल्यावर अशा क्षतिग्रस्त झाल्या या वास्तू....