आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा-कॅस्ट्रोंचे ऐतिहासिक हस्तांदोलन, उभय देशांतील तणाव निवळण्याची सुचिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनामा - फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्युबामध्ये झालेल्या क्रांतीनंतर विकोपाला गेलेले क्युबा-अमेरिका संबंध आता पुन्हा चांगल्या वळणावर येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी पनामा येथे अमेरिका खंडातील सर्व देशांच्या परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी हस्तांदोलन केले. दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान झालेले हे ऐतिहासिक हस्तांदोलन ठरले.

फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५९ मध्ये साम्यवादाचा पुरस्कार करत क्युबामध्ये सत्ता हाती घेतली होती. या क्रांतीनंतर साम्यवादाला विरोध असलेल्या अमेरिकेने यानंतरच्या काळात कधीच क्युबाला आपला मित्र मानले नाही. उलट अमेरिकेने ही क्रांती दडपून टाकण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र, भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेला फिडेल कॅस्ट्रो यांनी कधीच भीक घातली नाही.

यानंतरच्या काळात दोन्ही देशांत प्रचंड तणाव होता. तो निवळणे महत्वाचे होते. ओबामा यांच्या जन्मापूर्वीच्या या क्रांतीचे संदर्भ आधुनिक काळात विशेषत: २१ व्या शतकात मात्र पुरते बदलले आहेत. यापूर्वीच्या काळात फिडेल कॅस्ट्रो यांच्या जेव्हा कधी हल्ले झाले तेव्हा यात अमेरिकेचा हात असल्याचा संशय क्युबाला होता.

तणावाची कारणे
>फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखालील देशातील क्रांतीनंतर तणाव वाढला.
>अमेरिकेने क्युबावर निर्बंध लादले.
>याच काळात क्युबाने अमेरिकेचा पारंपरिक शत्रू असलेल्या रशियाशी संबंध वाढवले.
>१९६१ मध्ये दोन्ही देशांतील राजकीय संबंध संपुष्टात.