आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hitlers Torture On Jewish In Auschwitz Camp Polland

PHOTOS: हिटलरचा अत्याचार, छळ छावणीत लाखो ज्यूंनी गमावला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या महायुध्‍दात हुकूमशाहा अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी कॅम्पमध्‍ये तीन लाख ज्यूंच्या न‍िर्दयीपणे हत्या करण्‍यात सहभागी असलेला ऑस्कर ग्रोएनिंगविरुध्‍द मंगळवारपासून(ता.21) सुनावणी सुरु झाली आहे. तो आता 93 वर्षांचा आहे. त्यावेळी ज्यूंची स्थिती काय होती? त्यांनी कोणत्या यातना भोगल्या? या प्रश्‍नांच्या उत्तरांवर नजर टाकणार आहोत. 1933 मध्‍ये जर्मनीवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हिटलरने आर्यवंशाची सत्ता स्थापन केली. त्याच्या राज्यात ज्यूंना दुय्यम स्थान दिले गेले होते. ती मानवी वंशाची आहेत हे अमान्य करण्‍यात आले होते. ज्यूंच्या तिरस्काराचा परिणाम म्हणजे नरसंहार होय.याचा अर्थ असा, की ज्यूंना समूळ नष्‍ट करण्‍यासाठी नियोजनबध्‍द योजनेचा प्रयत्न.

होलोकास्ट इतिहासाचा तो नरसंहार होता. ज्यात सहा वर्षांनंतर जवळ-जवळ 60 लाख ज्यूंची हत्या करण्‍यात आली होती. यात केवळ 15 लाख केवळ मुले होते. या दरम्यान अनेक ज्यू देश सोडून पळून गेले. तर काही ऑशविच कॅम्पमधील अमानुष छळाने मृत पावली. यामुळे ऑशविच कॅम्प ज्यूंना संपवण्‍याचे नाझींचे अमानवी प्रतिक बनले होते. पोलंडच्या या छळ छावणीत धर्म, वंश, विचारधारा किंवा शारीरिक दुर्बलतेच्या नावावर ज्यूंना नाझींच्या गॅस चेंबरमध्‍ये पाठवले जायचे. येथे ज्यू, राजकीय विरोधक, रुग्ण आणि समलैंगिकांकडून जबरदस्तीने काम करुन घेतले जात होते. हा कॅम्प अशा ठिकाणी होता जेथून कोणीही पळून जाऊ शकत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ऑशविच कॅम्पमधील कैद्यांची कशी छळवणूक केली जायची...