आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसपेक्षा एचयूटी जास्त धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - कट्टर इस्लामी संघटना हिज्ब-उत-तहरीर (एचयूटी) भारतासाठी इस्लामी स्टेट इन इराक अँड सिरियापेक्षा (आयसीस) जास्त घातक ठरू शकते. एचटीयू कूटनीतीच्या माध्यमातून जगाची नजर चुकवून अतिशय गुप्तरीत्या दहशतवादी विचारधारा पसरवत आहे.
सीटीएक्स पत्रिकेच्या ताज्या अंकात यासंदर्भात अहवाल प्रकाशित करण्यात आला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, आयसीस सिरिया, इराकमध्ये क्रूर पद्धतींचा अवलंब करून जगाचे व माध्यमांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत आहे. एचयूटी अतिशय गुप्तपणे तरुणांची फौज तयार करू लागले आहे. अरब देशांच्या मदतीने ही संघटना खलिफाचे राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे.