आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयातच घर, १३ लाखांची बचत, लॉस एंजलिसच्या तरुणाचा कारनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - २०१२ ची गोष्ट आहे. टेरीने आपली पिशवी उचलली, त्यात कपडे ठेवले आणि व्हेनिस येथील २५० चौरस फुटांचा स्टुडिआे अपार्टमेंट सोडून तो कार्यालयात पोहोचला; परंतु लपूनछपून. जेणेकरून कोणालाही त्याचा मागमूस लागता कामा नये. टेरी आठवड्यात ६० तास काम करत असे. रुग्णालयाचे भलेमोठे बिल, विद्यार्थी आणि कारचे कर्ज चुकवता चुकवता घरभाडे देण्यासाठी पैसे राहायचे नाहीत.

टेरीने ही समस्या सोडवण्याचा मार्ग शोधून काढला. लेखन हा त्याचा ड्रीम जॉब होता. त्याला तो सोडायचा नव्हता. त्याला कामाचे तास वाढवायचे होते. त्यामुळेच तो नोकरी असलेल्या कार्यालयात आपल्या सामानासह दाखल झाला. तो तेथे एक, दोन नव्हे तर पाचशे दिवस मुक्कामी होता. त्याच्या सहका-यांना या गोष्टीची पुसट कल्पनाही आली नाही. टेरी के हे त्याचे नावही बनावट होते. खरे नावदेखील तो कोणाला सांगत नसे. टेरी भल्या सकाळी उठून निघून जात असे. अतिशय हुशारीने आपले सामान नीट पॅक करून तो ठेवत असे. एसीला बंद करत असे. जेणेकरून हाॅलमध्ये गारवा राहू नये, याची खबरदारी तो घ्यायचा. त्यानंतर तेथेच तो वर्कआऊट करून स्नान उरकत असे. बाथरूमही तशीच स्वच्छ करून ठेवत. त्यानंतर तयार होऊन तो खुर्चीवर बसत असे. लेखनाच्या छंदामुळे त्याला सर्व प्रकारच्या सुविधा सहजपणे मिळत असत.

टेरी कार्यालयात सर्वात अगोदर येतो, असेच लोकांना वाटे. अनेकवेळा तो कार्यालयात उशिराने येत. कार्यालयात दाखल झाल्यानंतर विलंबामागे लॉस एंजलिसच्या वाहतुकीला दोष देत. कारण लोकांना तो खरोखरच ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे वाटावे, म्हणून तो असे कारण सांगत. टेरीला ही व्यवस्था मनापासून आवडली. एका रूममेटने त्याला एकत्र राहण्याचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्तावही त्याने नाकारला. अशा प्रकारे त्याने संपूर्ण पाचशे दिवस कार्यालयातच बिनबोभाटपणे काढले; परंतु हळूहळू कंपनी तोट्यात गेली. त्यासोबत त्याचे घर आणि नोकरीही गेली. त्यानंतर तो आपल्या ट्रकमध्ये तयार करण्यात आलेल्या छोट्याशा घरात शिफ्ट झाला. अशा प्रकारे त्याने सुमारे १२.७४ लाख रुपयांची बचत केली. आता तो आपल्या तात्पुरत्या घरात खुश आहे. नोकरी जाण्याच्या अगोदर त्याने आपल्या तात्पुरत्या घरात प्लायवूड शेल्फ, छोटे फ्रीज, सुई आणि छोटा स्टोव्ह, पेपर टॉवेल जमा केले होते.
बातम्या आणखी आहेत...