आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hong Kong Pedestrians Collected Stones Fall On Street

VIDEO: हॉंगकॉंगमध्ये आकाशातून पडले हिरे, नंतर समजले की ते आहेत स्टोन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉंगकॉंग- आकाशातून हिरे पडल्याची दंतकथा ऐकायला छान वाटते. पण या शहरातील नागरिक तिला सत्यकथा समजून बसले. एक महिलेने आकाशातून हिरे पडल्याची माहिती इतरांना दिली. त्यानंतर हिरे गोळा करण्यासाठी एकच गर्दी उसळली. काही हिरे आकाराने लहान होते. हाताने ते उचलता येत नव्हते. तेव्हा लोकांनी विशेष प्रकारचे चिमटे आणले. हिरे गोळा केले. काहींनी ते ऑनलाईन विकलेही. एकाने सराफा दुकानात विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर समोर आले, की ते हिरे नसून केवळ स्टोन्स आहेत!!!
काय आहे प्रकरण
- हॉंगकॉंगच्या सिम शा सुई येथील नॅशनल रोडवरुन काल रात्री सुमारे 8.30 वाजता एका महिला चालत जात होती. यावेळी ती अचानक ओरडली, की हिऱ्यांचा पाऊस होत आहे. त्यानंतर लोकांनी एकच गर्दी केली.
- आकाशातून हिरे सदृष्य स्टोन्स पडत होते. रस्त्यावर सर्वत्र ते विखुरले होते.
- महिलेचे ओरडणे ऐकून शेकडो लोक जमा झाले.
- जिरकोनिक्स स्टोन्सना लोक हिरे समजून बसले.
- जिरकोनिक्स हिऱ्यासारखा चमकणारा एक स्टोन आहे.
नंतर झाली सर्वांची निराशा
- नॅशनल रोडवर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने ट्राफिक जाम झाले. काही लोक तर दुसऱ्यांकडचेही हिरेही हिसकावून घेत होते.
- चक्क एकमेकांना मारहाण होण्याची परिस्थिती उद्भवली. या दरम्यान एक विदेशी पर्यटकही थांबून स्टोन्स गोळा करु लागला.
- पण त्यानंतर सर्वांना समजले, की हे हिरे नाहीत. जिरकोनिक्स स्टोन्स आहेत.
- एका माणसाने तर चक्क दागिन्यांच्या दुकानात हे हिरे विकण्याचा प्रयत्न केला. त्याला दुकानदाराने चांगलेच फैलावर घेतले.
- काही लोकांनी हे हिरे ऑनलाईन वेबसाईट्सवर विकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काही जणांनी ते विकतही घेतले.
- या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मोठ्या संख्येने लोक क्युबिक जिरकोनिक्स स्टोन्स गोळा करताना दिसतात.
पोलिस चौकशी सुरु
- या प्रकरणी हॉंगकॉंग पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पण आकाशातून हिरे कसे पडले याची माहिती मिळू शकली नाही.
- एखाद्या व्यक्तीने उंच इमारतीवरुन हे स्टोन्स रस्त्यावर फेकले असावेत असे सांगितले जात आहे. पण याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
- गेल्या वर्षी हॉंगकॉंगमध्येच तीन मिलियन पाऊंड एवढी रक्कम घेऊन जात असलेली कॅश व्हॅन रस्त्यावर उलटली होती. त्यातून पैसे खाली पडले होते. त्यानंतर लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी चांगलाच गोंधळ घातला होता.
- काही दिवसांपूर्वी भारतातही असा प्रकार घडला होता. पण नाणी खरी होती. मुंबई-आगरा महामार्गावरील नरडाणा गावाजवळ नाण्यांचा ट्रक उलटल्याने रस्त्यांवर सर्वत्र नाणीच नाणी पडली होती. तेव्हा ती गोळा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी उसळली होती.
पुढील स्लाईडवर बघा, हॉंगकॉंगच्या रस्त्यावर पडलेले जिरकोनिक्स स्टोन्स गोळा करताना नागरिक... अशी उडाली झुंबड...