आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hong Kong Police Fire Warning Shots During Mong Kok Fishball \'riot\'

हाँगकाँगमध्ये दंगल; पोलिसांसह 100 जखमी, निदर्शकांची दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - बेकायदा फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर निदर्शकांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत किमान १०० जण जखमी झाले. जखमींमध्ये सुमारे ९० पोलिसांसह नागरिकांचा समावेश आहे. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.

२०१४ पासून प्रदेशात लोकशाही समर्थकांची सरकारच्या विरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भागात अशांतता आहे. माँगकॉकमध्ये मंगळवारी पोलिसांनी फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी असंतुष्ट फेरीवाल्यांनी काही वेळातच फुटपाथवरून विटा फेकणे सुरू ठेवल्या. विटा, बाटल्या, लाकडी तुकडे पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात आले. त्यात ९० पोलिस अधिकारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतरही निदर्शकांनी सातत्याने विटा फेकणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला, असा दावा पोलिस आयुक्त स्टीफन लो यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५४ जणांना अटक केली आहे. अटकेतील निदर्शकांचे वय १५-७० या वयोगटातील आहे. अटकेतील आरोपींना लवकरच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. त्यांना १० वर्षांची कैद होऊ शकते. दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेचा सरकार निषेध करते, असे हाँगकाँगचे नेते लाँग चुन-यिंग यांनी म्हटले आहे. शहराचे सीईआे म्हणाले, शेकडो जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्लाबोल केला. त्यामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हाँगकाँगमध्ये २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारामुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.
स्वायत्त चिनी शहर
दक्षिण चिनी प्रदेशातील हाँगकाँगमध्ये चिनी शहराच्या अधिपत्याखाली स्थानिक सरकार आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे. लोकशाहीनुसार येथे सरकार निवडण्याची संधी मिळावी, अशी मागणी नागरिकांनी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. परंतु त्याला सातत्याने चिनी सरकारने चिरडले आहे. त्यातूनच शहरात असंतोष आहे.