आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hong Kong Protesters Air Grievances On New Year's Day

हाँगकाँगमध्ये लोकशाहीवाद्यांची निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - नवीन वर्ष उजाडले असले तरी हाँगकाँगमधील नागरिकांना अजूनही स्वातंत्र्य दूर वाटू लागले आहे. म्हणूनच शुक्रवारी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. नेत्यांनी राजीनामे द्यावेत, कारण त्यांनी हाँगकाँगला विकल्याचा आरोप होत आहे.

पुढील पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात अनेक प्रकारचे प्रकल्प सुरू करण्यात आहेत; परंतु त्याचा नागरिकांना काहीही उपयोग नाही. ते केवळ पांढरे हत्ती आहेत. त्यांना पोसण्यात अर्थ नाही. त्यावर सुमारे ११ अब्ज डॉलर्स एवढा खर्च होणार आहे, असे निदर्शकांचे म्हणणे आहे. निदर्शनामध्ये सुमारे हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यात आणखी शेकडो नागरिक सहभागी होतील, असे सांगण्यात आले. नेते ल्युंग चुन यिंग यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली. त्यांनी अनेक पायाभूत प्रकल्प सुरू केले आहेत. तो पैशाचा अपव्यय आहे.

क्षेपणास्त्राच्या टप्प्यात अमेरिका
चीनने गुरुवारी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची यशस्वी चाचणी घेतली. त्याची मारक क्षमता सुमारे १२ हजार ७० किलो मीटर एवढी आहे. अर्थात चीनमधून अमेरिकेतील एखादे ठिकाण लक्ष्य केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र दुहेरी प्रकारातील हल्ले करू शकते. रेल्वेकारचे अतिवेगवान प्लॅटफॉर्म या क्षेपणास्त्राला अधिक धोकादायक बनवते. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी या क्षेपणास्त्राची प्रणाली तत्काळ पॅसेंजर रेल्वेमध्ये रूपांतरित होऊ शकते. क्षेपणास्त्राला कार्यान्वित करण्यासाठी त्याला बोगद्यासारख्या सुरक्षित ठिकाणी नेले जाऊ शकते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल यांग युजून यांनी ही माहिती दिली. वादग्रस्त दक्षिण चिनी सागरी भागात चीनने दुसरे विमानवाहू जहाज तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. वास्तविक, या सागरी भागावरून चीन, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई आणि तैवान या देशांचे त्यावरून मतभेद आहेत.

चीनविरोधी सूर
हाँगकाँग एकेकाळी ब्रिटिश वसाहत होती; परंतु १९९७ मध्ये त्यावर पुन्हा चीनने एका करारांतर्गत अधिसत्ता मिळवली; परंतु नागरिकांना चीनचा हस्तक्षेप मान्य नाही. त्यातून संघर्षाची स्थिती पाहायला मिळते.