आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात महागड्या शहराची भयावह स्थिती, कोंदट रुममध्‍ये राहायला लोक विवश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉंगकॉंग जगातील सर्वात महागडे शहर आहे. मात्र येथे राहणा-या बहुतेक लोक गरिबीत जगतात. 19 वर्षांपूर्वी 1 जुलै 1997 रोजी ब्रिटनने हॉंगकॉंग हे शहर चीनच्या स्वाधीन करण्‍यात आले होते. या मालिके अंतर्गत divyamarathi.com तुम्हाला येथील लोक कसे जगतात हे सांगणार आहे. पिंज-याच्या आकाराचे व बॉक्स घरात राहतात लोक...
- हॉंगकॉंग सरकारच्या अहवालानुसार, येथे प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती गरीब असतो.
- एक लाख लोक शवपेटी , पिंजरा व घराच्या छतावर राहतात.
- हे घर मेटल वायरचे बनलेले असतात. यात पाय पसरवणेही अवघड असते.
- काही लोक खूप छोट्या शू बॉक्स व क्युबिक्ससारख्‍या घरात राहतात.
- या घरांचे भाडेही खूप जास्त असते.
- या घरात राहणारे लोकांचे सरासरी उत्पन्न जवळजवळ 95 हजार रुपये आहे.
- या उत्पन्नातून लोक 34 हजार घरभाडे द्यावे लागते.
- येथे 40 टक्के लोक अनुदानित घरात राहतात.
- हॉंगकॉंगमधे राहण्‍याचा सरासरी आकार 452 चौरस फुट आहे.
- दरडोई राहण्‍याचा भाग 47.8 चौरस फुट आहे. हा आकार टेबल टेनिसपेक्षा थोडे जास्त आहे.
- 2013 च्या तुलनेत दरडोई राहण्‍याचा भाग 30 टक्क्यांनी घटले आहे.
- 30 हजारांपेक्षा कमी कमावणा-यांना दारिद्री रेषा खाली मानले जाते.
वृध्‍द -मुले सर्व दु:खी
- प्रत्येक 3 पैकी 1 वृध्‍दांचे जीवनावश्‍यक वस्तूंची गरज पूर्ण होत नाही.
- प्रत्येक 4 मधील 1 मुले 3 वेळेवर जेवण मिळत नाही.
- सरकारनुसार हॉंगकॉंगमध्‍ये 13 लाख लोक अधिकृत गरीब आहेत.
- यात 7 लाख लोक असे आहेत जे दारिद्र्यात राहतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज..