आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कार्यकर्तीला शिवीगाळ; पाकिस्तानात खासदाराचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- ऑनर किलिंग विषयावर सुरू असलेल्या टीव्हीवरील चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षातील संसद सदस्याने महिला हक्क कार्यकर्तीला शिवीगाळ केली.

तिच्यावर धावून जाण्याचा प्रयत्नही त्याने केला. ही चर्चा थेट प्रक्षेपित होत होती. हाफिज हमदुल्ला हे जमात-उलेमा-ए-इसला फजलचे सदस्य आहेत. ऑनर किलिंगच्या विरोधी मत मारवी सरमद या महिला हक्क कार्यकर्तीने मांडले. सरमद यांची मते पटल्याने हाफिज हमदुल्ला आक्रमक झाले आणि वाटेल त्या शब्दांत त्यांनी सरमद यांचा अपमान केला. त्यांच्यावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला.

हे फुटेज सोशल मीडियावर प्रसारित झाले. हमदुल्ला अर्वाच्य भाषेत बोलत होते. मारवी सरमद यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मारगल्ला पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये जमात उलेमाचे लोकप्रतिनिधी सहभागी आहेत.
ऑनर किलिंग हा प्रकार इस्लामला मंजूर नाही, असे धार्मिक मंडळाने मंगळवारीच जाहीर केले होते. हा प्रकार गैरइस्लामिक आहे. यानंतर ४० वरिष्ठ धर्मगुरूंनी ऑनर किलिंगविरुद्ध फतवाही जारी केला आहे. पाकिस्तानातील सर्व प्रमुख धर्मगुरूंनी ऑनर किलिंगला इस्लाममध्ये स्थान नसल्याचे म्हटले असले तरीही हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

पाकिस्तानात गेल्या वर्षभरात ऑनर किलिंगच्या १,१०० महिला बळी गेल्या आहेत. कुटुंबाच्या प्रतिष्ठेला जुमानता प्रेमसंबंध ठेवणाऱ्या वा विवाह करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबानेच संपवण्याच्या घटनांत पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी अशाच एका घटनेत भावाने बहिणीला पेटवले होते. भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)