आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील अखेरचा पांढरा गेंडा मृत्यूशय्येवर, संपूर्ण प्रजातीच होणार नष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेकिपिया - केनियाच्या ओल पेजेटा वन्य प्राणी संग्रहालयातील नॉर्दर्न व्हाइट रायनो (पांढरा गेंडा) कडून त्याचा वंश वाढवण्याची अखेरची आशाही संपुष्टात येत आहे. वाढत्या वयाबरोबरच गेल्या काही दिवसांत या गेंड्याच्या पायातील बळ कमी होऊ लागले आहे. तसेच त्याच्या स्पर्म काऊंटमध्येही कमालीची घट पाहायला मिळाली आहे. त्याचे वयही बरेच वाढले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या ब्रीडींग प्रोग्राममध्ये यश मिळणे कठीण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सूडान नावाचा हा गेंडा पृथ्वीवरील त्यांच्या प्रजातीतील अखेरचा नर आहे. त्याच्यावरच त्याच्या प्रजातीचे भवितव्य अवलंबून असल्याने ही प्रजातीच नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओल पेजेटाचे प्रमुख एक्झिक्युटिव्ह रिचर्ड विग्ने म्हणाले की, सुडान फारच वृद्ध झाला आहे. तो मृत्यूशय्येवर आहे आणि तेच सत्य आहे. अभयारण्यात त्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र जवान तैनात करण्यात आलेत. 24 तास शिकाऱ्यांपासून त्याला वाचवत आहेत. जगात आता केवळ या प्रजातीचे चारच रायनो आहेत. त्यापैकी सूडान नर असून त्याच्यासह दोन मादा केनियात आहेत. तर एक मादी अमेरिकेच्या सॅन डिएगा येथे आहे.

ब्रीडींगचे प्रयत्न अपयशी
सूडानला 2009 मध्येच त्याच्या प्रजातीच्या दोन मादींसह चेक रिपब्लिकहून केनियाला आणले होते. येथील ओल पेजेटा येथे खास गेंड्यांचे संवर्धन केले जाते. तसेच त्यांचा रायनो म्हणजे गेंड्यांचा ब्रीडींग प्रोग्रामही चांगलाच यशस्वी राहिला आहे. त्यामुळे सुडानला येथे ठेवण्यात आले होते. पण त्याच्यासाठी राबवण्यात आलेला ब्रीडींग प्रोग्राम अपयशी ठरला.

शिंग काढले
या गेंड्याच्या शरिरावर रेडिओ ट्रान्समीटर लावण्यात आले होते. खबरदारी म्हणून त्याचे शिंगही काढण्यात आले. शिकाऱ्यांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी तसे केल्याचे अभयारण्यातील कर्मचारी सांगतात. शिंग नसलेल्या गेंड्याला मारण्यात शिकाऱ्यांना काहीही रस नसतो असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या गेंड्याच्या शिंगाचे दर 36 ते 43 लाख रुपये किलो आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा. सुडानचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...