वॉशिंग्टन- 'टाइम' मॅगझिनची 'पर्सन ऑफ द ईयर'ची स्पर्धा आता रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. जगातील टॉप दिग्गजांसोबत आता अमेरिकन घोडा ‘फॅरो’ हा देखील स्पर्धेत सहभागी झाला आहे. फॅरो हा अमेरिकेतील ट्रिपल क्राउन विजेता आहे.
फॅरोसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन, मलाला यू्सुफजई, पोप फ्रांसिस, सुंदर पिचाई, सेरेना विलियम्स, एंजेला मार्केल, मार्क झुकरबर्ग आदी दिग्गजांमध्ये काट्याची लढत आहे. स्पर्धेत अन्य कलाकारांसह एकूण 58 दावेदार आहेत.
अमेरिकेच्या हॉर्स रेसिंगच्या इतिहासात पहिल्यांदा ‘अमेरिकन फॅरो’ला टाइम मॅगझिनने आपल्या 'पर्सन ऑफ द ईयर' स्पर्धेच्या यादीत सहभागी करून घेतले आहे. ‘फॅरो’ने पहिल्यांदा 2015 मध्ये अमेरिकन ट्रिपल क्रॉउन व ब्रीडर्स कप क्लासिक पटकावला होता. फॅरोने हॉर्स रेसिंगच्या ग्रँड स्लेमवर देखील स्वत:चे नाव कोरले आहे.
फॅरोचा मालक अहमद जायात व ट्रेनर बॉब बफेट आहे. अहमद जायात यांनी फॅरोला त्याच्या वयाच्या दुसर्या वर्षीच ट्रॅकवर उतरवले होते. दरम्यान ब्रीडर कप ज्युवेनिलेपूर्वी तो जखमी झाला होता. मात्र, तरी देखील त्याने विजयश्री खेचून आणली होती. 2014 मध्ये त्याने इक्लिपस अवार्ड पटकावला होता. ऑगस्ट 2015 मध्ये मोनमाउथ पार्कमध्ये हसकेल स्पर्धेत फॅरोने विजेतेपदाला गवसनी घातली होती. त्यानंतर त्याने साराटोगा स्पर्धेत सात घोड्यांशी स्पर्धाकरून विजय पटकावला होता. ब्रीडर कपमध्ये तर फॅलोने धम्माल केली होती. 61/2 लांब ट्रॅक त्याने कमी वेळात पूर्ण करून रेकॉर्ड ब्रेक विजय प्राप्त केला होता.