आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hottest President Of Croatia Kolinda Grabar Kitarović

बिकिनी मॉडेल नव्हे या आहेत एका देशाच्या राष्ट्राध्यक्ष, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोत दिसणाऱ्या कोलिंडा ग्रॅबर-कितारोविक या मॉडेल किंवा अभिनेत्री नसून क्रोएशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत. त्या क्रोएशियाच्या चौथ्या राष्ट्राध्यक्ष आहेत. 19 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली होती. देशाच्या प्रमुख पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. सध्या त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
कोलिंडा यांचा जन्म 29 एप्रिल 1968 चा आहे. 2011 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी नाटोमध्ये काम केले आहे. त्याठिकाणी त्यांनी सहायक सरचिटणीस म्हणून काम सांभाळले होते. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. नाटोमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी क्रोएशियाच्या परराष्ट्र मंत्रालयामध्येही काम सांभाळले होते. 2005 ते 2008 या काळात इव्हो सनादेर यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्य होत्या. तसेच अमेरिकेत क्रोएशियाच्या राजदूत म्हणूनही त्यांनी 2008 ते 2011 या काळात कामकाज पाहिले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोलिंडा ग्रॅबर यांच्याबाबत...