Home »International »Other Country» How A Bikini Idea Make Her Billionaire, News, Feature

बिकिनीच्या आयडियाने बनली अब्जाधीश, ग्राहकांना असे केले आकर्षित...

बिकीनीच्या एका अजब आयडियाने या महिलेचे आयुष्यच बदलले आहे. ही यशोगाथा आहे वियतनामच्या न्युयेन थी फ्वोंग थाओ यांची...

दिव्य मराठी वेब टीम | Sep 25, 2017, 14:44 PM IST

  • बिकीनीमध्ये एयरहोस्टेस, इन्सेटमध्ये सीईओ थाओ...
इंटरनॅशनल डेस्क - बिकीनीच्या एका अजब आयडियाने या महिलेचे आयुष्यच बदलले आहे. ही यशोगाथा आहे वियतनामच्या न्युयेन थी फ्वोंग थाओ यांची... थाओ सध्या विएतजेट नामक एयरलाईन्स कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीची कमाई 180 कोटी डॉलर अर्थातच 11700 कोटी रुपये एवढी आहे. आपल्या विमानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी बिकीनी एयरहोस्टेसची संकल्पना मांडली. हीच संकल्पना त्यांच्या विमान कंपनीचे वैशिष्ट्य बनले. त्यांच्या फ्लाइटमध्ये सर्वच एयरहोस्टेस चक्क बिकीनीमध्ये असतात.

विमानात डान्सवरून झाला वादंग
विशेष म्हणजे, थाओ आपल्या विमानाच्या सेवा महागडी तिकीटे घेणाऱ्यांसाठी नाही, तर बजेटवर भर देणाऱ्या विमान प्रवाश्यांसाठी सुरू केली. समस्त आशिया खंडातील 47 शहरांमध्ये त्यांच्या विमानसेवा आहेत. विएतजेट आपल्या एयरहोस्टेसच्या पेहरावामुळे जेवढी चर्चेत आहे, तेवढीच वादात देखील आहे. नुकतेच त्यांच्या एका विमानात एयरहोस्टेसेसने बिकीनी डान्स केला होता. यानंतर देशभर वादंग उठला. सरकारने तर, या कंपनीच्या एयरहोस्टेसला यापुढे संपूर्ण कपडे घालण्याचे निर्देश दिले.

बिकीनीच्या आयडीयाने बनवले अब्जाधीश
- जगभरातील विमान कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा आणि डिस्काउंट देतात. त्याच मार्गावर जात थाओ यांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी विमानात आपल्या एयरहोस्टेसचा पेहराव बिकीनी केला.
- विमान कंपनीच्या जाहिरात आणि प्रोमोशनसाठी थाओ यांनी कॅम्पेन सुरू केले. यात त्यांनी आपल्या एयरहोस्टेसेसला लाल रंगाच्या बिकिनी दिल्या. त्याच बिकिनीमध्ये अॅड कॅम्पेन चालवले.
- यात विमानामध्ये सुद्धा एयरहोस्टेसला लाल रंगाच्या बिकीनीत रॅम्प वॉक करायला लावला जातो.
- या कॅम्पेन्समुळे एयरलाईन्सकडे एवढे विमान प्रवासी आकर्षित झाले की कंपनी देशात 40 टक्के वाटा असलेली विमान कंपनी बनली.
- आज या विमान कंपनीची कमाई 11700 कोटी रुपये असून थाओ जगातील सर्वात धनाढ्य लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, फ्लाइटमध्ये होतो रॅम्पवॉक, असतो असा नजारा...

Next Article

Recommended