आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Religion Spread Across The World, Watch Video

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनसह जगभरात कसा झाला विविध धर्मांचा प्रसार, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात पसरलेल्या धर्मांपैकी पाच सर्वात मोठे धर्म म्हणजे हिंदु, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम. गेल्या हजारो वर्षांमध्ये या धर्मांनी जगाच्या विविध भागांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मानवजातीच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंतच्या मार्गक्रमणामध्ये या धर्मांचा सर्वच बाबींवर मोठा प्रभाव राहिला आहे. त्या धर्मांतील तत्वांनुसार संबंधित समाजाच्या विकासाचा वेगही कमी जास्त असलेला आपल्याला जाणवतो. अनेक वाद, इतर धर्मांचे अडथळे आणि अशा अनेक बाबी असतानाही जगभरात या धर्मांनी आपले पाय रोवले. एवढेच नाही, तर या धर्मांचा प्रसारही सुरू आहे. ठरावीक भुभागानुसार हे धर्म जगभरात अजूनही वाढत आहेत. हे धर्म नेमके जगभरात कशाप्रकारे पसरले याचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून जगात कोणत्या भागात कोणत्या धर्माचा प्रसार कसा झाला याची माहिती मिळू शकते.
(व्हिडिओ पाहा वरील स्लाइडवर)
व्हिडिओ सौजन्य - बिझनेस इनसायडर