आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS चे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांवरही करतात रेप, त्यांना टॉर्चरही करतात : HRW

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HRW कडे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हवाजामध्ये सुन्नी अरबी महिलांवर अत्याचार केल्याचे, त्यांना मारहाण केल्याचे आणि बळजबरी विवाह, बलात्कार केल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. - फाइल - Divya Marathi
HRW कडे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हवाजामध्ये सुन्नी अरबी महिलांवर अत्याचार केल्याचे, त्यांना मारहाण केल्याचे आणि बळजबरी विवाह, बलात्कार केल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. - फाइल
नवी दिल्ली/बगदाद - यहुदी महिलांना वाईट वागणूक देणारे ISIS चे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांचा बलात्कार करण्याबरोबरच त्यांना टॉर्चरही करतात. ह्यूमन राइट्स वॉचने हे मत मांडलेले आहे. वाचडॉगसमोर इस्लामिक स्टेटद्वारे हवाजामध्ये सुन्नी अरबी महिलांना बळजबरीने ताब्यात ठेवणे, मारहाण करणे, बळजबरीने विवाह, रेप अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हवाजावर अजूनही IS चे नियंत्रण आहे. तो इराकच्या किरकूक प्रांतातील एक जिल्हा आहे. 

26 वर्षांची हनानची कथा आली समोर 
- न्यूज एजन्सीच्या मते हवाजामध्ये गव्हर्नमेंट फोर्सेस आणि इस्लामिक स्टेटच्या जिहादींमध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. 
- HRW ने 26 वर्षांच्या हनानच्या कहाणीचे उदाहरण देत सांगितले की, तिचा नवरा अचानक हवाजामधून गायब झाला होता. 
- हनानसह इतर महिला जेव्हा शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी IS च्या दहशतवाद्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 
- IS च्या दहशतवाद्यांनी हनानला सांगितले की, तिचा पती पळून गेल्याने ती पतित झाली असून तिने आता एखाद्या स्थानिक जिहादीबरोबर निकाह करायला हवा. 
- हवाजामधून पळून जाणाऱ्या इराकी कुटुंबांना शहरापासून 25 km अंतरावर हलवण्यात आले आहे. 

चिमुरड्यांसमोर रोज बलात्कार 
- हनानने जेव्हा या प्रस्तावाला नकार दिला तेव्हा तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून प्लास्टीकच्या केबल्सने तिला मारहाण करण्यात आली. 
- हनानचे हात मागे बांधण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 
- हनानने HRW ला सांगितले की, एकाच व्यक्तीने रोज तिच्यावर बलात्कार केला. 
- एका महिन्यांनी तिच्या डोळ्यांवरील पट्टी खोलण्यात आली. 
- त्यानंतर तिच्या मुलांसमोरही तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

HRW चे मत.. 
- वाचडॉगच्या मते, या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलेलेच नाही. ज्याप्रकारे हा मुद्दा हाताळण्यात आला, त्यावरही कलंक लागला. 
- त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर समोर येत नाहीत. 
- HRW च्या डेप्युटी मिडल ईस्ट डायरेक्टर लामा फॅकियाह म्हणाल्या, ISIS च्या काळात सुन्नी अरबी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. 
- या सर्व पीडितांना पाठिंबा देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आणि लोकल अथॉरिटीज यांच्यासाठी जे काही करू शकतात ते करण्याचा प्रयत्न करतात. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...